Saturday, June 13, 2026
BusinessENTERTAINMENTLatest News

शिल्पा शेट्टी-कुंद्रा ने ओम्नी चॅनल ‘फार्म-टू-फोर्क’ स्टार्ट-अप ‘किसानकोनेक्ट’ मध्ये केली खास गुंतवणूक !

फिटनेस आणि उत्तम आरोग्य याकडे जिचा कल आहे अशी अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच निरोगी राहण्यााठी तिच्या फॅन्स ना काहीतरी खास टिप्स देत असते. तिच्या फिटनेस च्या चर्चा तर सर्वत्र आहेत. तंदुरुस्तीच्या सर्वात महत्त्वाच्या घटक म्हणजे आहार आणि ” फ्रेश फूड” ! फ्रेश फूड ही संकल्पना शिल्पा एका खास पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना सांगत खास संदेश देते आहे.

या पार्टनरशिप बद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, मी एक फिट आणि निरोगी भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवते आणि आणि मी वैयक्तिक आयुष्यात देखील ही गोष्ट पाळते किसानकोनेक्टच्या संस्थापकां ची संकल्पना मला आवडली ते खाण्यासाठी सुरक्षित अन्नाची समस्या तर सोडवत आहेतच, पण ते हजारो शेतकर्‍यांना थेट ग्राहकांशी जोडत आहेत. माझ्या देशात, जिथे शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे, तिथे आरोग्याला चालना देण्याच्या माझ्या विचारांशी ते या खास गोष्टी मधून जोडले जात आहे म्हणून मी किसानकनेक्ट सोबत पार्टनर शिप करण्याचे ठरवले आहे. ग्राहक किसानकोनेक्ट अॅपवर त्यांना लागणारं फूड शोधू शकतात आणि त्यावर विश्वास ठेवू शकतात. आमची ‘फार्म स्टोअर्स’ ही संकल्पना देखील ग्राहकांशी जोडली आहे. ” आपका अपना शेतकरी बाजार ” ही संकल्पना यातून पुढे येणार हे नक्कीच !

किसनकोनेक्ट ही नवीन कंपन्यांपैकी एक आहे, जी ग्राहकांना सर्वात कमी वेळेत ताजे उत्पादन पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते.

स्वदेशी किसान-कनेक्टचे संस्थापक विवेक निर्मल म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना ताजे आणि पौष्टिक उत्पादन देण्याच्या आमच्या प्रवासात शिल्पाची भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून सुरुवात केली होती. माती परीक्षणापासून आमचे एकात्मिक मॉडेल, ‘पुनर्जनशील कृषी’ वर आधारित वनस्पती जैविक शास्त्र आमच्या हजारो शेतकरी सदस्यांना सक्रिय आणि निरोगी मातीचे संगोपन करण्यास मदत करत आहे. आमचे अनोखे मॉडेल अल्पभूधारक शेतकर्‍यांना चांगला परतावा आणि ग्राहकांसाठी ताजे आणि पौष्टिक अन्न सुनिश्चित करते.

सह-संस्थापक निधी निर्मल पुढे म्हणाले, ‘आम्हाला FnV स्पेसमध्ये सर्वात मोठे वर्गीकरण आणि ऑर्डर केल्याच्या ४-६ तासांत मुंबई आणि पुण्यात कुठेही सेवा मिळाल्याचा अभिमान वाटतो. आमच्याकडे अनेक स्लॉट आहेत जेथून ग्राहक डिलिव्हरीसाठी निवडू शकतात किंवा ते आमच्या जवळच्या ‘फार्म स्टोअर्स’मध्ये सहज जाऊ शकतात.

शिल्पा शेट्टी पुढे इंडियन पुलिस फोर्स मध्ये दिसणार आहे,रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वातील पहिली महिला पोलीस आहे, सोबत ती सुखी दिसनार आहे आणि अलीकडेच मॅग्नम-ऑपस केडी ची घोषणा केली आहे जिथे तिने पहिली झलक दाखवली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading