पुण्याचे डॉ. अजय दुधाणे यांना दिल्लीत कृतज्ञता पुरस्कार प्रदान
पुणे : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय व अन्य संस्थांनी जानेवारी ते मार्च २०२३ या दरम्यान ‘नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत’ नशामुक्त भारत यात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये २२ राज्य व १५०० किमी झालेल्या या यात्रेत १२० ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यात पुण्याच्या डॉ.अजय दुधाणे यांनी घेतलेलया सक्रिय सहभागाबद्दल नशा उन्मूलन सन्मान २०२३ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
काशियाना फौडेशन यांच्या पुढाकाराने दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर मधे झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, अपंग कल्याण भारत सरकारांचे माजी आयुक्त डॉ.कमलेशकुमार, खासदार हंसराज हंस, पद्मश्री डॉ.दीपा मालिका, काशियाना फौंडेशन चे अध्यक्ष सुमितकुमार सिंग आदी उपस्थित होते.
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून डॉ. अजय दुधाणे हे गेली २१ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या यात्रेत त्यांनी महाराष्ट्रातील समन्वयक म्हणून काम पाहिले होते.
