fbpx

कान्स 2023: सनी लिओनीचा ब्लश गुलाबी स्लिट गाऊन मधला ग्लॅमरस अंदाज !

बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री सनी लिओन हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तिच्या ‘केनेडी’ चित्रपटाच्या मध्यरात्रीच्या स्क्रिनिंगच्या वेळी तिच्या ग्लॅमरस लूक ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आदरणीय अनुराग कश्यप द्वारे दिग्दर्शित, ‘केनेडी’ सन्माननीय ज्युरीं नी निवडलेला एकमेव चित्रपट आहे.

प्रतिष्ठित प्रीमियर रात्रीसाठी, सनी लिओनीने प्रतिभावान नाजा सादेने डिझाइन केलेला एक उत्कृष्ट ब्लूश गुलाबी वन-शोल्डर गाउन निवडला. कॉलरबोनवर नाजूक ब्रोचने सुशोभित केलेला गाऊन ने सनीचा ग्लॅमरस अंदाज दाखवला. सनीच्या रेड कार्पेट लूक ने प्रेक्षकांची मन जिंकली.

तिच्या लूकमध्ये ग्लॅमर तर आहेच  सनी लिओनीने स्वतःला हेलेना जॉयच्या उत्कृष्ट दागिन्यांनी अनोखा साज केला होता. हेलेना जॉयने डिझाइन केलेले सुंदर दागिने सनीवर उठून दिसत होते.

बॉडी-हगिंग सॅटिन ग्रीन ड्रेस आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंट मल्टी-कट ड्रेसमध्ये तिने सगळ्यांची मन जिंकली  कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनी ने फॅशन गेम सेट केला ! नाजा सादे आणि हेलेना जॉय सोबतचे तिचं फॅशन  सहकार्य तिच्या स्टाईल आयकॉन म्हणून तिची वेगळी ओळख संपादन करते !

Leave a Reply

%d bloggers like this: