fbpx

वी ऍपमार्फत केलेल्या रिचार्जसोबत वी ग्राहक मिळवू शकतील ५जीबी अतिरिक्त डेटा

  • २९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेचे रिचार्ज करणाऱ्या युजर्सना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता मिळेल ५जीबी अतिरिक्त डेटा (तीन दिवसांसाठी वैध राहील)
  • १९९ ते २९९ रुपयांदरम्यान रिचार्ज करणाऱ्या युजर्सना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता मिळेल २जीबी अतिरिक्त डेटा (तीन दिवसांसाठी वैध राहील)
  • या डेटा बोनान्झाचा लाभ घेऊन वी ग्राहक क्रिकेट, सिनेमे, व्हिडिओ पाहू शकतील, संगीत ऐकू शकतील, खरेदी, चॅटिंग, काम किंवा अभ्यास करू शकतील.

आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वीने आकर्षक ‘महा’ रिचार्ज प्रस्तुत केले आहे, यामध्ये फक्त वी ऍपमार्फत रिचार्ज करून, कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता वी ग्राहकांना अतिरिक्त डेटा मिळवता येणार आहे.

२९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या वी रिचार्जेससोबत कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता, ५जीबी अतिरिक्त डेटा (वैधता तीन दिवस राहील) मिळवता येईल. १९९ आणि २९९ रुपयांदरम्यानच्या रिचार्जेससोबत कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता २जीबी अतिरिक्त डेटा (वैधता तीन दिवस राहील) मिळवता येईल. मर्यादित कालावधीची ही ऑफर सध्या १९९ रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या सर्व वी प्रीपेड रिचार्जेससोबत फक्त वी ऍपवर उपलब्ध आहे.

हा अतिरिक्त डेटा वापरून वी युजर्स वी मुव्हीज अँड टीव्हीवर सिनेमे, लाईव्ह स्ट्रीम व्हिडिओ किंवा सध्या सुरु असलेल्या टी२० स्पर्धेतील क्रिकेटचे सामने पाहू शकतील, वी म्युझिकवर आपल्या आवडीच्या संगीताचा आनंद घेऊ शकतील, खरेदी, सर्फिंग, चॅटिंग, काम किंवा अभ्यास करू शकतील. या डेटाचा लाभ घेऊन वी ऍपवर वी गेम्स खेळता येतील. यामध्ये १० लोकप्रिय शैलींमधील १२०० पेक्षा जास्त अँड्रॉइड व एचटीएमएल५ बेस्ड मोबाईल गेम्सचा इमर्सिव्ह गेमिंग अनुभव घेता येतो.

सध्या वीवर वी२०फॅनफेस्ट चॅलेंज सुरु आहे, यामध्ये वी ग्राहकांना सामन्याच्या प्रत्येक दिवशी एक स्मार्टफोन जिंकण्याची संधी दिली जात आहार.  स्पर्धेच्या एका मेगा विजेत्याला टी२० चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची दोन तिकिटे जिंकता येतील. वी ग्राहक वी२०फॅनफेस्ट चॅलेंज वी फेसबुक पेज – @ViOfficialFanWorld, वी इंस्टाग्राम पेज – viofficialfanworld, वी ट्विटर पेज – @ViCustomerCare वर सामने सुरु असताना खेळू शकतील.

Leave a Reply

%d bloggers like this: