ड्युरोफ्लेक्सच्या नवीन ‘मॅट्रेस एक्स्चेंज’ उपक्रमाकडून ग्राहकांना त्यांच्या झोपेचा अनुभव अपग्रेड करण्याचे आवाहन
पुणे: रात्रीच्या वेळी पुरेशी व उत्तम झोप मिळणे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. खरेतर हे संतुलित, पौष्टिक आहाराचे सेवन व व्यायाम करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. पण अनेक लोकांना माहित नाही की त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी त्यांची मॅट्रेस दर ७ ते ८ वर्षांनी बदलणे आवश्यक आहे. याबाबत त्यांना माहित असले तरी जुन्या मॅट्रेसेसचे काय करावे याबाबत माहित नसल्याने ते त्यांची मॅट्रेस बदलण्याबाबत संकोच करतात. या समस्येचे निराकरण करण्यासोबत व्यक्तींच्या झोपेच्या अनुभवाबाबत सुधारणा करण्याच्या मनसुब्यासह ड्युरोफ्लेक्स या भारतातील अग्रगण्य स्लीप सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने त्यांचा ‘मॅट्रेस एक्स्चेंज’ उपक्रम सादर करणसाठी नवीन डिजिटल जाहिरात प्रदर्शित केली आहे. हा उपक्रम व्यक्तींना त्यांच्या जुन्या मॅट्रेसेस एक्स्चेंज करून सवलतीच्या दरामध्ये नवीन मॅट्रेस खरेदी करण्याची सुविधा देतो. ही ऑफर २८ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२३ पर्यंत उपलब्ध असेल.
या उपक्रमाबाबत आपले मत व्यक्त करत ड्युरोफ्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहनराज जे. म्हणाले, ‘‘ड्युरोफ्लेक्समध्ये आमचे भारतीयांना उत्तम व आरोग्यदायी झोप मिळण्यास मदत करण्याचे मुलभूत ध्येय आहे. तीव्र पाठदुखी ते स्किन एलर्जीपर्यंत जुनी मॅट्रेस तिच्या जीवनकाळानंतर वापरल्याने प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. भारतातील स्लीप एक्स्पर्ट म्हणून आमचा ड्युरोफ्लेक्स एक्स्चेंज उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या जुन्या मॅट्रेसेसच्या बदल्यात त्यांच्या गरजांना अनुसरून व त्यांना रात्रीच्या वेळी उत्तम झोप देणारी घरगुती संशोधन-आधारित मॅट्रेस खरेदी करण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे.’’
दर ७ ते ८ वर्षांनी मॅट्रेसेस बदलणे आवश्यक आहे. ८ वर्षांपलीकडे दीर्घकाळापर्यंत त्याच मॅट्रेसेस वापरल्यामुळे अयोग्य पवित्रा व झोपमोड यांचा त्रास होऊ शकतो. ही बाब पाहता जुन्या मॅट्रेसच्या जागी नवीन मॅट्रेस खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी ही अद्भुत संधी आहे. ब्रॅण्ड उशा, मॅट्रेस प्रोटेक्टर्स व फर्निचर अशा इतर उत्पादनांवर देखील सूट देतो.
डिजिटल जाहिरातीमधील ब्रॅण्डने सादर केलेल्या प्रसंगामध्ये दाखवण्यात आले आहे की व्यक्ती एका ऑक्शनमध्ये त्याची जुनी, फाटलेली व डाग लागलेली मॅट्रेस विकरण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्याची फोम मॅट्रेस दाखवत उपस्थितांपैकी कोणी मॅट्रेस खरेदी करण्यास इच्छुक आहे का असे विचारतो, ज्याबाबत सर्वजण हसायला लागतात. जाहिरातीच्या शेवटी पाहायला मिळते की तो स्वप्नामधून जागे होण्यासोबत स्वप्नामध्ये देखील जुनी मॅट्रेस विकणे किती अवघड आहे आणि ड्युरोफ्लेक्सच्या ‘मॅट्रेस एक्स्चेंज’ उपक्रमामध्ये नोंदणी केल्यास या समस्येचे निराकरण होण्यास मदत होऊ शकते हा संदेश पाहायला मिळतो.
