Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल फाऊंडेशन चा संयुक्त उपक्रम

पुणे :  वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल सोशल इनोव्हेशन फाऊंडेशन यांनी आज पुण्यातील महाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण पूर्ण करून त्याचे उदघाटन केले. हा उपक्रम वॅबटेक च्या  केअरिंग फॉर अवर कम्युनिटीज  प्रोग्रामचा एक भाग आहेजगभरात ज्या ठिकाणी वॅबटेक चे कर्मचारी राहतात किंवा काम करतात व अश्या ठिकाणी सामाजिक कार्यात पूर्णपणे योगदान देण्याचा वॅबटेकचा चा प्रयत्न असतो.  

वॅबटेकचे इंडिया सोर्सिंगचे वरिष्ठ संचालकविजय इनामके यांनी नूतनीकरण केलेल्या शाळेचे उद्घाटन केले. त्यांनी क्लस्टर हेड  मारुंजी, सुरेश साबळेजि.प.शाळेचे मुख्याध्यापक आनंद राऊतशाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष श्रीमती अनिता साळुंखेसदस्य श्रीमती सरिता मुरकुटे आणि चिराग भंडारी (एनोबल संस्थापक) यांच्या उपस्थितीत शाळेच्या अधिकाऱ्यांना हस्तांतरण केले.

साजिद इक्बाल, (वाईस प्रेसिडेंटएच.आर आणि सी.एस.आर) म्हणाले किवॅबटेक आपल्या कार्यक्षेत्रातील समाज कल्याणासाठी कटिबद्ध आहे. मला पुण्यातील आमच्या सी.एस.आर उपक्रमांच्या विस्तारामुळे आनंद होत आहे. यावर्षी वॅबटेकने भारतातील ५० शाळांमध्ये सामाजिक कार्य करून बदल घडवून आणला आहे. पुण्यातील दोन शाळांमध्ये पायाभूत सुविधांची सुधारणा उपयुक्त ठरणार आहेजेणेकरून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छसुरक्षित व अतिउत्तम शिक्षणाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे”.

या उपक्रमांतर्गत,पुण्यातील काही विभागामध्ये एक विस्तृत सर्वेक्षण केले गेलेत्यामध्ये पुण्यातील दोन शाळांना अद्यावतीकरण करण्यासाठी निवडण्यात आले व सर्वसमावेशक मूल्यांकन करून शाळा नूतनीकरणाची योजना आखण्यात आली. या कार्यासाठी वॅबटेकने एनोबल सोशल इंनोव्हेशन फौंडेशन सोबत पार्टनरशिप केलीहि संस्था सरकारी शाळांचा अद्यावतीकरण करण्यामध्ये तज्ज्ञ आहे. ज्यांनी बऱ्याच राज्यात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे.

शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून आणि शिक्षणासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करून सरकारी शाळांना प्रेमळ आणि समाजाची पहिली पसंती बनवण्याचा संकल्प  एनोबल या संस्थेने केला आहे,” एनोबल सोशल इनोव्हेशन फाऊंडेशन चे संस्थापक चिराग भंडारी म्हणाले कि, “आम्हाला वॅबटेक सोबत पार्टनरशिप केल्याचा अभिमान वाटतोजे त्यांच्या सी.एस.आर कार्यक्रमांतर्गत शिक्षणाचे स्तर उंचाविण्यासाठी लक्ष केंद्रित करते”.

वॅबटेक चे इंडिया ग्लोबल सोर्सिंग कार्यालय बाणेरपुणे कार्यरत आहे. ही संस्था वॅबटेक च्या जागतिक आणि देशांतर्गत वेगवेगळ्या कारखान्यांसाठी कॉम्पोनेन्ट्स सोर्सिंग करते. वॅबटेक कंपनी भारतीय रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांना लोकोमोटिव्ह आणि सबसिस्टिम पुरवते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading