Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

कलाकारांनी महाराष्‍ट्राची वैविध्‍यपूर्ण संस्‍कृती व परंपरांप्रती व्‍यक्‍त केले त्‍यांचे प्रेम व अभिमान

१ मे हा महाराष्‍ट्र दिन आहे, जो राज्‍याच्‍या स्‍थापनेला साजरा करणारा महाराष्‍ट्र दिवस किंवा महाराष्‍ट्र दिन म्‍हणून ओळखला जातो. या क्षणाला साजरे करण्‍यासाठी एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी माँ’), जगन्‍नाथ निवंगुणे (रामजी सकपाळ, ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्‍मा, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी, ‘भाबीजी घर पर है’) राज्‍याप्रती त्‍यांचा अभिमान व्‍यक्‍त करत आहेत.

मालिका ‘दूसरी माँ’मधील नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्‍हणाल्‍या, ‘‘आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असताना मला खूप अभिमान आणि सन्मान वाटतो. मी नाशिकमधून आले आहे, जे महाराष्ट्राचे प्राचीन शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि अनेक मराठा योद्धे व व्यक्तिमत्त्वांचे घर आहे. देशातील सर्वात स्मार्ट शहरांपैकी एक बनून शहराची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली प्रचंड वाढ पाहून मला आश्‍चर्य वाटते. माझ्या कामामुळे मी अनेकदा मुंबई ते नाशिक प्रवास केला आहे, ज्‍यामुळे मुंबई माझे दुसरे घर बनले आहे. मी या शहराची ऋणी आहे, ज्याने मला प्रसिद्धी, ओळख आणि आपुलकी दिली. व्यावसायिक राजधानी असण्याव्यतिरिक्त शहर कला, नाट्य आणि मनोरंजनाचे केंद्र आहे. महाराष्ट्राचा एक अभिमानी नागरिक म्हणून मला आपल्या राज्याचा सांस्कृतिक वारसा, गौरवशाली इतिहास आणि प्रगतीचा खूप अभिमान आहे. मला आशा आहे की, हा दिवस आपल्याला शांतता आणि सामाजिक समरसतेच्या योग्य मार्गाकडे घेऊन जाईल. माझ्याकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.’’ मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर’मधील जगन्‍नाथ निवंगुणे ऊर्फ रामजी सकपाळ म्‍हणाले, ‘‘नमस्कार महाराष्ट्र. या उत्‍साहपूर्ण व वैविध्यपूर्ण राज्याचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. कला, संस्कृती, साहित्य, संगीत आणि शोबिझ उद्योगात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. अभिनेता म्हणून मी मनोरंजनक्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभावान कलाकारांसोबत काम केले आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या सर्जनशील क्षेत्राची वाढ व विकासात मोठे योगदान दिले आहे. माझे महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि माझ्याकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.’’

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ‘‘महाराष्ट्रामध्‍ये स्थापत्य, कला आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या पाककृतींसह बरेच काही आहे. मी पुरणपोळी, कांदेपोहे, थालीपीठ आणि मिसळ यांसह इतर अनेक स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेते. स्वप्ननगरी मुंबईत आल्यापासून हे पदार्थ माझ्या आहारामध्‍ये नक्‍की असतात. मला हे शहर विविध कारणांसाठी आवडते, पण खाद्यपदार्थ यादीत अग्रस्‍थानी आहेत (हसतात). महाराष्ट्र राज्‍य नेहमीच प्रेरणास्रोत राहिले आहे आणि या भूमीत अनेक यशोगाथा आहेत. या राज्याला माझे घर म्हणण्याचा मला अभिमान वाटतो. माझ्याकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.’’ मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी म्‍हणाल्‍या, ‘‘महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रातील लोकांना एकत्र आणतो आणि राज्‍याचा संयुक्‍त इतिहास, संस्कृती व ओळख यांना साजरे करतो. हे राज्‍य अजिंठा व एलोरा लेणी यांसारख्या अनेक प्रमुख ऐतिहासिक स्थळांचे घर आहे आणि साहित्य, संगीत व चित्रपटातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे. या शुभदिनी महाराष्ट्राची अनोखी संस्कृती व वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, तसेच राज्य व राज्‍यामधील लोकांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कार्य करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करूया.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading