शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन
पुणे – शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्व.जगन्नाथ सकट सेवाभावी संस्थेतर्फे नाना पेठ येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित जगन्नाथ सकट, डीसीएम सोसायटीचे सेक्रेटरी विशाल शेवाळे, शिवसेना उपशहरप्रमुख विकास भांबुरे, शिवराम मंडळाचे अध्यक्ष असीफ शेख, कीरण कुंजीर, भरत दुधाणे, विशाल पवार, गणेश खरात, रुपेश खिलारे, सतीश कांबळे, काशिनाथ गायकवाड, प्रशांत नेटके, निलेश शर्मा, हितेश काळोखे, मारुती काळोखे, शेखर चक्रनारायण , राजेश लोंढे, जय दोडके, अक्षय अवचिते आदी उपस्थित होते.
यावेळेस इंद्रजित सकट, विकास भांबुरे व गणेश खरात यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिवादन केले तसेच सदर ठीकाणी शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा पुर्णाकृती पुतळा पुणे महापालिकेच्या वतीने बसविण्यात यावा अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली.
