गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट; 2 तास झाली चर्चा
मुंबई : विरोधकांच्या निशाण्यावर असणारे वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी यांनी आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये सिल्व्हर ओकवर दोन तास चर्चा झाली. या भेटीने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
हिंडेनबर्ग अहवालावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच या आरोपाची जेपीसीद्वारे चौकशी व्हावी, यासाठी विरोध आक्रमक आहेत.
मात्र, शरद पवारांनी जेपीसी चौकशीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. या सा-या पार्श्वभूमीवर अदाणी-पवारांच्या भेटीला महत्त्व आले आहे.
