Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

मॅनकाईंड फार्मा लिमिटेडचा आयपीओ २५ एप्रिल पासून खुला होणार

मुंबई : मॅनकाईंड फार्मा लिमिटेड (“कंपनी”)ने ४०,०५८,८४४ “इक्विटी शेअर्स” (“ऑफर”) साठी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मंगळवार २५ एप्रिल २०२३ पासून खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बीड/ऑफर खुली होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २४ एप्रिल २०२३ आहे.

प्रति इक्विटी शेअरवर १,०२६ रुपये ते १,०८० रुपये इतका  किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान १३ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर १३ च्या पटीत लावता येणार आहे.

४०,०५८,८४४ इक्विटी शेअर्स ऑफर मध्ये रमेश जुनेजा यांच्या द्वारे ३,७०५,४४३ इक्विटी शेअर्स,  राजीव जुनेजा द्वारे ३,५०५,१४९ इक्विटी शेअर्स, शीतल अरोरा यांच्या द्वारे २,८०४,११९  इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, “प्रवर्तक विक्री समभागधारक”),  केर्नहिल सीआयपीईएफ लिमिटेडचे १७,४०५,५५९ इक्विटी शेअर्स; केर्नहिल सीजीपीई लिमिटेडचे २,६२३,८६३ इक्विटी शेअर्स, बेज लिमिटेडचे ९,९६४,७११ इक्विटी शेअर्स; आणि लिंक इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे ५०,००० इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे, “गुंतवणूकदार विक्री समभागधारक”, आणि “प्रवर्तक विक्री समभागधारक” यांसह संयुक्तरित्या “विक्री समभागधारक”) समाविष्ट आहेत.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम ३१  सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(१) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या ५०% पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”)  राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. जर प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रस्तावित पेक्षा कमी समभागांना मागणी आली किंवा प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्शामध्ये वाटप झाले नाही तर असे सर्व शिल्लक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (“QIBs”) हिश्शामध्ये वर्ग करण्यात येतील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी ५ % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ऑफर प्राईस इतक्या किंवा QIB भागाच्या ५% हून कमी किमतीला बोली मिळाल्यास QIB मध्ये सुयोग्य वाटपासाठी म्युच्युअल फंड भागात वाटणीसाठी उपलब्ध झालेले राहिलेले इक्विटी समभाग उर्वरित QIB भागात वर्ग होतील.

तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा प्रमाणित तत्वावर NIIs साठी बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग २००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १,०००,०००  रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील दोन तृतीयांश भाग १,०००,०००  रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. आणि सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीच्या या दोन्ही उप विभागांत कमी खरेदी झाल्यास बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीच्या दुसऱ्या  उप विभागांत वाटप केले जाईल. ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल.

पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरचा ३५% पेक्षा कमी नसलेला भाग RIIs (“रिटेल श्रेणी”) साठी उपलब्ध होईल. ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे  ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, आणि बीएसई सह एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”) या दोन्हींवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरचे (“BRLMS”) बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

येथे वापरल्या जाणार्‍या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइझ संकल्पनांचा १४ एप्रिल २०२३  (“रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस” किंवा “RHP”) च्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद केल्याप्रमाणे समान अर्थ असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading