सोनीकडून वास्तविक पिक्चर क्वॉलिटी व सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासह प्रभावी मनोरंजनासाठी ब्रॅव्हिया एक्स८०एल टेलिव्हिजन सिरीज लॉन्च
नवी दिल्ली : सोानी इंडियाने आज आकर्षक पिक्चर क्वॉलिटी व अद्भुत साऊंड असलेल्या ब्रॅव्हिया एक्स८०एल टेलिव्हिजन सिरीजच्या लॉन्चची घाषणा केली. नवीन एक्स८०एल सिरीज व्हिजन व साऊंडला नव्या उंचीवर घेऊन जाते आणि गुगल टीव्हीसह व्यापक मनोरंजन देते. आमच्या पिक्चर व साऊंड तंत्रज्ञानाच्या वास्तविकतेच्या माध्यमातून आकर्षक रंगसंगती सादर करण्यात आल्या आहेत.
१. एक्स१ ४के एचडीआर पिक्चर प्रोसेसरसह अपवादात्मक पिक्चर क्वॉलिटीचा अनुभव घ्या
सोनीची नवीन टीव्ही सिरीज एक्स८०एल सिरीजसाठी २१५ सेमी (८५ इंच), १२६ सेमी (५० इंच) आणि १०८ सेमी (४३ इंच) या आकारांमध्ये उपलब्ध आहे. सोनी एक्स८०एल मध्ये सर्वोत्तम व्युईंग अनुभव देणारे एक्स१ ४के एचडीआर पिक्चर प्रोसेसरसह ऑब्जेक्ट-आधारित एचडीआर रिमास्टर आहे. स्क्रिनवरील इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट्सचे विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार कॉन्ट्रास्ट समायोजित केले जाते. तुलनेत इतर बहुतांश टेलिव्हिजन्समध्ये कॉन्ट्रास्ट फक्त एका ब्लॅक-टू-व्हाइट कॉन्ट्रास्ट कर्व्हवर समायोजित केले जाते. ऑब्जेक्ट्स वैयक्तिकरित्या रिमास्टर केले जात असल्यामुळे हा टीव्ही सखोल डेप्थ, टेक्स्चर्स आणि अधिक वास्तववादी पिक्चर्सची निर्मिती करू शकतो.
२. ट्रायल्युमिनस™ प्रो डिस्प्ले असलेली नवीन एक्स८०एल सिरीज वास्तविक रंगसंगतीची निर्मिती करते
एक्स८०एल सिरीज व्यापक कलर गम्यूटसह येते आणि अद्वितीय ट्रायल्युमिनस प्रो™ अल्गोरिदम प्रत्येक पिक्चरमध्ये नैसर्गिक रंगसंगतींची निर्मिती करण्यासाठी सॅच्युरेशनमधील कलर, रंगछटा व ब्राइटनेस ओळखू शकते. तुम्ही वास्तविक विश्वामध्ये दिसण्यात येणारे रंग पाहण्याचा आनंद घ्याल.
३. डॉल्बी व्हिजन™ व डॉल्बी अॅटमॉस™ सह सिनेमामधील रोमांचचा आनंद घ्या
डॉल्बी व्हिजन™ असलेली नवीन ब्रॅव्हिया एक्स८०एल लाइनअप एचडीआर सोल्यूशन आहे, तुमच्या घरामध्ये सर्वोत्तम, सर्वसमावेशक सिनेमॅटिक अनुभवाची निर्मिती करत आकर्षक, सखोल डार्क्स व वैविध्यपूर्ण रंगांमध्ये सीन्स पाहण्याचा अनुभव देते. डॉल्बी अॅटमॉससह नवीन ब्रॅव्हिजया एक्स८०एल ४के टेलिव्हिजन्समधील सर्व बाजूंनी विशाल साऊंडचा अनुभव मिळतो, ज्यामुळे तुम्हाला अस्सल मल्टी-डायमेन्शनल अनुभवासाठी अधिक स्पष्टपणे आवाज ऐकायला येतो.
४. एक्स८०एल सिरीजमधील एक्स-बॅलन्स्ड स्पीकरसह सर्वोत्तम साऊंड अनुभवाचा आनंद घ्या
टेलिव्हिजन्सची साऊंड क्वॉलिटी व स्लिमनेसला पूरक म्हणून एक्स८०एल सिरीजमध्ये अद्वितीय नवीन आकार असलेले आणि सुस्पष्ट आवाजासह चित्रपट व म्युझिकचा आनंद देणारे एक्स-बॅलन्स्ड स्पीकर वैशिष्ट्य डिझाइन करण्यात आले आहे.
५. एक्स८०एल सिरीज गुगल टीव्हीसह देते स्मार्ट युजर अनुभव, ज्यामध्ये ७,००,००० हून अधिक मूव्हीज व टीव्ही सिरीजसह १०,००० हून अधिक अॅप्स व गेम्सच्या माध्यमातून अविरत मनोरंजन मिळते. हे अॅप्पल एअरप्ले2 व होमकिटसोबत देखील एकसंधीपणे काम करते.
नवीन ब्रॅव्हिया एक्स८०एल सिरीजसह १०,००० हून अधिक अॅप्स डाऊनलोड करा, ७००,००० हून अधिक चित्रपट व टीव्ही एपिसोड्स, तसेच लाइव्ह टीव्ही एकाच ठिकाणी पहा. गुगल टीव्ही अॅप्स व सबस्क्रिप्शनसमधील सर्वांचे आवडते कन्टेन्ट एकत्र आणते आणि त्यांचे व्यवस्थापन करते. शोधणे अगदी सोपे आहे, फक्त गुगलला विचारा. अॅप्समध्ये शोध घेण्यासाठी म्हणा ‘हे गुगल, फाइण्ड अॅक्शन मूव्हीज’. ग्राहक वैयक्तिकृत शिफारशींसह पाहण्यासाठी सुलभपणे शोध घेऊ शकतात आणि फोनमधील वॉचलिस्टची भर करत शोज व चित्रपट बुकमार्क करू शकतात, काय पाहिले आहे हे लक्षात राहण्यासाठी टीव्हीवर पाहू शकतात. वापरकर्ते त्यांचे फोन किंव लॅपटॉपमधून त्यांची वॉचलिस्ट गुगल सर्चसह भर करू शकतात आणि एकाच ठिकाणी सर्वकाही मिळू शकते. ब्रॅव्हिया एक्स८०एल मध्ये अॅप्पल होम किट व एअरप्ले आहे, जे प्रभावी कन्टेन्ट स्ट्रिमिंगसाठी टीव्हीसोबत आयपॅड्स व आयफोन्स सारख्या अॅप्पल डिवाईसेसना एकसंधीपणे एकीकृत करते.
६. हँड्सफ्री वॉईस सर्च वैशिष्ट्यासह तुम्ही टीव्हीशी संवाद साधत तुमचे आवडते शोज व चित्रपट पाहू शकता.
तुमच्या आवाजाचा उपयोग करत अधिक जलदपणे आवडते कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घ्या, ज्यासाठी आता रिमोटची गरज नाही. वॉईस सर्चसह गुंतागूंतीचे नेव्हिगेशन किंवा त्रासदायक टायपिंगची गरज नाही, फक्त संवाद साधत विचारा. टीव्हीवरील बिल्ट-इन मायक्रोफोन्स प्रेक्षकांना अस्सल हँड्स-फ्री अनुभव देतील. प्रेक्षक त्यांना पाहिजे असलेले मनोरंजन त्वरित मिळवण्यासाठी किंवा टीव्ही रिमोटचा वापर न करता टीव्ही शोज, चित्रपट पाहण्याचा आनंद घेण्यासाठी गुगल असिस्टण्टचा वापर करत टीव्हीशी संवाद साधू शकतात;
७. सर्वोच्च दर्जाच्या प्युअर स्ट्रिम™ ८० एमबीपीएससह आयमॅक्स एन्हान्स्ड चित्रपटांच्या सर्वात मोठ्या कलेक्शनचा आनंद घेण्यासाठी एक्स८०एल सिरीज आता ब्रॅव्हिया कोअरसह येते
ब्रॅव्हिया कोअर अॅपमध्ये मूव्ही सर्विस प्री-लोडेड आहे, ज्यामधून सुपरहिट चित्रपटांच्या अमर्यादित स्ट्रिमिंगसाठी ५ नवीन रीलीज झालेले चित्रपट व क्लासिक ब्लॉकबस्टर्सचे रिडमप्शन मिळते. यामधून तुम्हाला ४के ब्लू-रे तंत्रज्ञानामध्ये स्ट्रिम करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोनी पिक्चर्सच्या चित्रपटांची व्यापक लायब्ररी मिळते. ब्रॅव्हिया एक्स८०एकल एक्स्पेरिअन्स प्युअर स्ट्रिम ही सर्वोच्च स्ट्रिमिंग पिक्चर क्वॉलिटी आणि आयमॅक्स® एन्हान्स्ड चित्रपटांचे सर्वात मोठे कलेक्शन उपलब्ध होण्यासह तुम्ही पाहणारा प्रत्येक सीन आकर्षक व्हिज्युअल्स व एक्स्प्रेसिव्ह साऊंड क्वॉलिटीसह येतो. ब्रॅव्हिया कोअर कॅलिब्रेटेड मोडसह चित्रपट आपोआपपणे सानुकूल पिक्चर सेटिंग्जशी समायोजित होत घरामध्ये अपवादात्मक चित्रपट पाहण्याचा अनुभव मिळतो.
८. एक्स८०एल पीएस५ वैशिष्ट्यासह येते, जे ऑटो एचडीआर टोन मॅपिंग व ऑटो जेन्रे पिक्चर मोडसह गेमिंग अनुभवामध्ये अधिक उत्साहाची भर करते. यामधील एचडीएमआय २.१ कॉम्पॅटिबिलिटी ऑटो लो लेटण्सी मोड (एएलएलएम) सह गेमिंगला पाठिंबा देते.
एचडीएमआय २.१ मध्ये ऑटो लो लेटण्सी मोडसह एक्स८०एल कनेक्ट केलेल्या कन्सोलला ओळखते आणि आपोआपपणे लो लेटण्सी मोडला चालू करते. तुम्ही अधिक सुलभपणे, अधिक प्रतिसादात्म्क गेम प्लेचा आनंद घेऊ शकाल, जे अत्यंत गतीशील, हाय-इंटेन्सिटी गेम्ससाठी महत्त्वाचे आहे. ऑटो एचडीआर टोन मॅपिंगसह एचडीआर सेटिंग्ज तुमच्या पीएस५™ कन्सोलच्या सुरूवातीच्या सेटअपदरम्यान तवरित सानुकूल होईल. तुमचे पीएस५™ आपोआपपणे वैयक्तिक ब्रॅव्हिया टीव्ही मॉडेल्सना ओळखते आणि टीव्हीनुसाार सर्वोत्तम एचडीआर सेटिंग निवडते. ज्यामुळे हाय कॉन्ट्रास्ट सीन्समध्ये देखील तुम्हाला स्क्रिनच्या सर्वात प्रखर व गडद भागांमध्ये महत्त्वाचे सीन्स व कलर्स पाहायला मिळतील. इनपुटमधील अडथळा कमी करण्यासाठी आणि अॅक्शनला अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी टीव्ही आपोआपपणे गेम मोडमध्ये बदलेल. प्लेस्टेशन५® कन्सोल्सवर चित्रपट पाहताना टीव्ही पुन्हा अधिक एक्स्प्रेसिव्ह सीन्ससाठी पिक्चर प्रोसेसिंगवर फोकस करण्याकरिता स्टॅण्डर्ड मोडवर येतो.
९. एक्स८०एल सह गेम मेनू सहजपणे गेमिंग स्टेटस, सेटिंग्ज व गेमिंग असिस्ट फंक्शन्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते
एक्स८०एल सिरीजमध्ये वापरण्यास सुलभ गेम मेनू आहे, जेथे गेमर्स त्यांच्या पसंतीनुसार सेटिंग्ज तयार करू शकतात, जसे जलद अॅक्सेससह व्हीआरआर किंवा मोशन ब्लर रिडक्शन चालू-बंद करू शकतात. गेम मेनू वापरकर्त्यांना गडद भागांमध्ये ब्राइटनेस वाढवण्याची देखील सुविधा देते, ज्यामुळे ब्लॅक इक्विलायझरसह ऑब्जेक्ट्स व प्रतिस्पर्धी सहजपणे ओळखता येतात आणि सहा प्रकरच्या क्रॉसहेअर्ससह प्रतिस्पर्धींवर नजर ठेवता येऊ शकते. या सिरीजमधील नवीन वैशिष्ट्य म्हणजे लहान, फोकस स्क्रिनसह गेमिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्क्रिन साइज वैशिष्ट्याच्या माध्यमातून स्क्रिनचा आकार सानुकूल करण्याची क्षमता.
१०. गेस्चर कंट्रोलस, अॅम्बियण्ट ऑप्टिमायझेशन व गुगल मीट इत्यादींचा समावेश असलेल्या ब्रॅव्हिया कॅमसह धमाल नवीन टीव्ही अनुभवांचा आनंद घ्या
अधिक सर्वोत्तम व्युईंग अनुभवासाठी ब्रॅव्हिया टीव्हीला स्वतंत्र विक्री करण्यात येणाऱ्या ब्रॅव्हिया कॅमसोबत कनेक्ट करा. ब्रॅव्हिया कॅम तुम्ही रूममध्ये कुठे आहात आणि टीव्हीपासून तुम्ही किती दूर आहात हे ओळखते, त्यानुसार साऊंड व पिक्चर सेटिंग्ज सानुकूल करते. तुम्ही गेस्चर कंट्रोल्स असलेल्या ब्रॅव्हिया कॅमसह धमाल नवीन टीव्ही अनुभवांचा देखील आनंद घेऊ शकता, गुगल मीट वैशिष्ट्याच्या माध्यमातून मित्र व कुटुंबियांसोबत मोठ्या स्क्रिनवर व्हिडिओ कॉल्स करू शकता. टीव्ही व तुमच्यामधील अंतर ओळखत ब्रॅव्हिया कॅम टीव्ही ब्राइटनेस समायोजित करते, ज्यामुळे तुम्ही रूममध्ये कुठेही असला तरी परिपूर्ण पिक्चर क्वॉलिटीचा आनंद घेऊ शकता. टीव्हीमधील लाइट व कलर सेन्सर सर्वोत्तम व्युईंग अनुभवासाठी प्रकाशाच्या स्थितींनुसार पिक्चर्स सानुकूल करते.
११. अॅम्बियण्ट ऑप्टिमायझेशन, लाइट सेन्सर आणि अकॉस्टिक ऑटो कॅलिब्रेशन तंत्रज्ञानासह प्रत्येक वातावरणामध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या पिक्चर्स व साऊंडचा अनुभव घ्या
लाइट सेन्सरसह अॅम्बियण्ट ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञान असलेली एक्स८०एल सिरीज रूममधील स्थितीननुसार पिक्चर ब्राइटनेस समायोजित करते, लाइट असलेल्या रूम्समध्ये उत्तम ब्राइटनेसची खात्री देते आणि गडद रूम्मध्ये ब्राइटनेस कमी करते, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण दृश्य मिळते. अकॉस्टिक ऑटो कॅलिब्रेशन तंत्रज्ञान तुमचे स्थान ओळखून साऊंड सानुकूल करते, ज्यामुळे तुम्ही अगदी टीव्हीच्या जवळ असला तरी तुम्ही त्याच साऊंड क्वॉलिटीचा आनंद घेऊ शकता. रूममधील वातावरणानुसार साऊंड बदलू शकते. उदाहरणार्थ, रूममधील पडद्यांमुळे आवाज कमी होऊ शकतो, टीव्हीसमोरील वस्तूंमुळे आवाजाच्या मार्गात अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही ऐकत असलेल्या आवाजाच्या दर्जाबाबत तडजोड होऊ शकते. हा टीव्ही वस्तूंना ओळखत साऊंडची निर्मिती करतो, ज्यामुळे रूममधील आवाज वाढण्यासोबत सानुकूल होऊ शकतो.
१२. एक्स८०एल सिरीज एक्स-प्रोटेक्शन प्रो सह खडतर स्थितींमध्ये परफॉर्म करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे
नवीन व सुधारित एक्स-प्रोटेक्शन प्रो तंत्रज्ञानासह निर्माण करण्यात आलेली नवीन ब्रॅव्हिया एक्स८०एल सिरीज दीर्घकाळापर्यंत टिकण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये धूळ व आर्द्रतेपासून उच्च दर्जाचे संरक्षण आहे, तसेच या सिरीजने सोनीच्या लायटनिंग चाचण्यांच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता केली आहे. म्हणजेच टीव्ही वीजेचा कडकडाट आणि खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या स्थितीत सुरक्षित राहतो. दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या टीव्हीसह एकसंधी मनोरंजनाचा आनंद घेत राहा.
१३. आकर्षक सरफेस डिझाइन, स्लिम टी-आकाराचे वेज्ड स्टॅण्ड आणि सहा हॉट कीज असलेले स्लीक स्मार्ट रिमोट याहस एक्स८०एल लिव्हिंग रूममध्ये सहजपणे सामावून जाते
एक्स८०एलची अद्वितीय आकर्षक सरफेस डिझाइन टीव्हीला आकर्षक, समकालीन लुक देते. या आकर्षकतेचा तुमच्या व्युईंगच्या पद्धतीवर काहीच अडथळा येत नाही. स्लीक व एकसंधी स्टॅण्ड टीव्हीशी परिपूर्णपणे जुळण्याकरिता, तसेच तुमच्या रूमच्या सजावटीमध्ये सामावून जाण्याकरिता डिझाइन करण्यात आले आहे. स्मार्ट रिमोटसह सर्व कनेक्टेड डिवाईसेस नियंत्रित करता येऊ शकतात. लोअर बटन्स व स्पेशल पॉलियुरेथेन कोटिंग असण्यासह आकर्षक सरफेससह डिझाइन करण्यात आलेला रिमोट सहजपणे पुसता येण्यासोबत स्वच्छ करता येतो. सर्व बटनांना अॅण्टीबॅक्टेरिअल मटेरिअलचे कोटिंग देण्यात आले आहे. रिमोटसह सहा हॉट कीज आहेत (ब्रॅव्हिया कोअर, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्नी+ हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि यूट्यूब). बटनाच्या प्रेससह तुमच्या आवडत्या व्हिडिओ ऑन डिमांड सर्विसेस उपलबध होतात आणि काही सेकंदांत लिव्हिंग रूममध्ये शोज व चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
१४. वातावरण लक्षात घेत सिरीज डिझाइन करण्यात आली आहे
अधिक मोठ्या आकाराच्या टीव्ही स्क्रिन्ससाठी वाढती मागणी उत्तम संसाधन व ऊर्जा वापरासह येते. सोनीच्या शाश्वतेप्रती कटिबद्धता उत्पादन विकसित करण्यापासून टीव्ही पाहण्यापर्यंतच्या कार्यक्षमतेला ओळखत आहेत. त्यांच्या रोड टू झीरो उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर कमी करण्याप्रती कटिबद्धता कायम आहे. पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासठी सोनी उत्पादन जीवन चक्राच्या अनेक पैलूंवर काम करत आहे, जसे व्हर्जिन प्लास्टिकचा वापर कमी, परिवहन कार्यक्षमतेमध्ये सुधारणा आणि वापरादरम्यान ऊर्जा वापराचे अवलोकन. तसेच सर्व २०२३ मॉडेल्समध्ये समाविष्ट करण्यात आलेले नवीन इको डॅशबोर्ड वापरकर्त्यांना ऊर्जा बचत करणारे प्राधान्य व सेटिंग्ज सुलभपणे सानुकूल करण्याची सुविधा देते.
किंमत आणि उपलब्धता:
| मॉडेल | सर्वोत्तम किंमत (रूपयांमध्ये) | उपलब्धता तारीख |
| केडी-४३एक्स८०एल | ९९,९०० रूपये | १९ एप्रिल २०२३ पासून |
| केडी-५०एक्स८०एल | ११४,९०० रूपये | १९ एप्रिल २०२३ पासून |
| केडी-८५एक्स८०एल | लवकरच जाहीर करण्यात येईल | लवकरच जाहीर करण्यात येईल |
हे मॉडेल्स भारतातील सर्व सोनी सेंटर्स, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवर उपलब्ध असतील.
