अॅलनतर्फे पीजी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सुपरअॅप लाँच
नवी दिल्ली, – अॅलन हे भारतात वैद्यकीय क्षेत्राचे प्रशिक्षण देणारे प्रसिद्ध नाव असून त्यांनी नुकताच अॅलन नेक्स्ट अॅप हा अत्याधुनिक प्लॅटफॉर्म लाँच केला. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने विद्यार्थ्यांना नीट- पीजी, आयएनआय- सीईटी आणि एफएमजीई तयारीसाठी सर्वसमावेशक सुविधा दिली जाणार आहे. या अॅपमध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आणि स्त्रोतांचा समावेश करण्यात आला असल्यामुळे ते सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इतर अॅप्सपेक्षा वेगळे ठरते.
अॅलन नेक्स्ट व्हर्टिकलचे पूर्ण वेळ अधिकारी अमन माहेश्वरी म्हणाले, ‘अॅलन नेक्स्ट अॅपच्या मदतीने वैद्यकीय पीजी प्रवेश परीक्षेची तयारी प्रक्रिया सुलभ आणि विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कितीही व्यग्र असले, तरी सहज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. नीट- पीजी, आयएनआय- सीईटी आणि एफएमजीई परीक्षा सोडवण्याची पूर्ण योजना उपलब्ध करून देत पीजी वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक ध्येय सहजपणे पार करण्यास सक्षम करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.’
पीजी वैद्यकीय विद्यार्थ्याचे आयुष्य आव्हानात्मक असते असे म्हणायला हरकत नाही. अतिशय धावपळीचे इंटर्नशीप वेळापत्रक आणि त्याचबरोबर परीक्षांच्या तयारीचा ताण यामुळे त्यांच्यावर मोठे ओझे तयार होऊ शकते. मात्र, अॅलन नेक्स्ट अॅप आणि त्याची अल्फा, बीटा व डेल्टासारखी सर्वसमावेशक पॅकेजेस लाँच झाल्यामुळे वैद्यकीय पीजी विद्यार्थ्यांची परीक्षांची तयारी करण्याची पद्धत आमूलाग्र बदलणार आहे.
या अॅपमध्ये वेगवेगळ्या स्त्रोतांची गरज काढून टाकण्यात आली आहे व प्रसिद्ध शिक्षकांकडून आटोपशीर आणि अद्ययावत शैक्षणिक कंटेंट उपलब्ध करण्यात आला आहे.
अल्फा, बीटा आणि डेल्टा या सर्वसमावेशक पॅकेजमध्ये विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यात आल्या आहेत तसेच त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी सर्वोत्तम स्त्रोत उपलब्ध होतील याची काळजी घेण्यात आली आहे.
अल्फा अभ्यासक्रम – या पॅकेजमध्ये वर्गातील ऑफलाइन शिक्षण आणि उजळणीची सांगड घालण्यात आली आहे. यामध्ये ७०० पेक्षा जास्त तासांचे व्हिडिओज, चांगली रँक मिळवण्यासाठी अतिरिक्त एज व्हिडिओज, नेक्स्टच्या दुसऱ्या टप्प्यासाठी क्लिनिकल कौशल्याचे व्हिडिओज, २०० पेक्षा जास्त तासांचे वेगवान उजळणी करून घेणारे व्हिडिओज, गेल्या वर्षातील प्रश्नांचा समावेश असलेले १०,००० पेक्षा जास्त प्रश्न, आरएसीई आणि क्लिनिकल प्रश्न व त्याचबरोबर विषयानुसार लहान- मोठ्या प्रकारच्या २०० पेक्षा जास्त चाचण्या, डिजिटल व प्रिंटेड नोट्स यांचा समावेश आहे.
बीटा अभ्यासक्रम: हे पॅकेज ऑनलाइन लर्निंग आणि उजळणीसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये अल्फा अभ्यासक्रमातील सर्व स्त्रोतांचा समावेश करण्यात आला आहे उदा- ७०० पेक्षा जास्त तासांचे व्हिडिओज, क्लिनिकल कौशल्याचे व्हिडिओज, अतिरिक्त एज व्हिडिओज, १०,००० पेक्षा जास्त प्रश्न, विषयानुसार लहान- मोठ्या प्रकारच्या २०० पेक्षा जास्त चाचण्या, डिजिटल व प्रिंटेड नोट्स यांचा समावेश आहे.
डेल्टा कोर्स – या पॅकेजमध्ये १०,००० पेक्षा जास्त प्रश्न आणि विषयानुसार लहान- मोठ्या प्रकारच्या २०० पेक्षा जास्त चाचण्या यांवर भर देण्यात आला आहे.
सुधारित शिक्षणासाठी विविध वैशिष्ट्यांनी युक्त अॅप
हे अॅप दैनंदिन प्रश्नमंजुषा, संकल्पनेवर आधारित व्हिडिओ सेक्शन्स, अद्ययावत बातम्या, परीक्षेची माहिती आणि नीट-पीजी, आयएनआय- सीईटी, एफएमजीई आणि नेक्स्ट यामध्ये टेस्ट करण्यात आलेल्या संकल्पनांवर आधारित व्हिडिओ बँक यांचा समावेश आहे. ७०० पेक्षा जास्त तासांचा कंटेंट इंग्रजी व हिंग्लिशमध्ये उपलब्ध करून देणारे हे अॅप अनुभवी आणि नावाजलेल्या शिक्षकांद्वारे शिकवले जाते.
मुख्य व्हिडिओ कंटेटशिवाय या अॅपमध्ये अतिरिक्त एज व्हिडिओज, क्लिनिकल व्हिडिओज आणि प्रॅक्टिकल व्हिडिओज क्लिनिकल व्हिडिओजचे सखोल आकलन व्हावे व विद्यार्थी नेक्स्ट- रेडी व्हावेत या हेतूने देण्यात आले आहेत. शेवटच्या क्षणी सराव करता यावा यासाठी २०० पेक्षा जास्त उजळणीचे व्हिडिओज, एमसीक्यू डिस्कशन व्हिडिओज, इमेज डिस्कशन व्हिडिओज, अपडेट्स आणि इन्स्ट्रुमेंट व्हिडिओजही या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
प्रत्यक्षातील चाचणी सराव
अॅलन नेक्सट केवळ ऑनलाइन स्त्रोत पुरवत नाही, तर विद्यार्थ्यांना कम्प्युटरवर आधारित ऑफलाइन, विषयानुसार लहान- मोठ्या टेस्ट अॅलनच्या देशभरातील कोणत्याही केंद्रावर जाऊन सोडवता येतात. यामुळे त्यांना प्रत्यक्ष वातावरणाचा अनुभव घेता येतो आणि प्रत्यक्ष परीक्षेआधी आवश्यक सुधारणा करता येतात.
सहज उपलब्ध आणि भविष्यातील विस्तार:
अॅलन नेक्स्ट अॅप प्लेस्टोअर तसेच अॅड्रॉइड या दोन्हीवर डाउनलोडसाठी करता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सहजपणे उपलब्ध होते. त्याशिवाय अॅलन नेक्स्ट ऑफलाइन केंद्रे लवकरच देशभरात लाँच केली जातील व विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षण घेण्याची संधी मिळेल.
