Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘मराठी पाऊल पडते पुढे’ …. ५ मे रोजी प्रदर्शित होणार

मराठी मालिका विश्वातून थेट 83  ह्या बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ रुपेरी वाळूत सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या लव्हस्टोरीने सजलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा 5 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने चिराग आणि सिद्धी हे प्रथमच एकत्र आले आहेत.  ह्या दोन्ही कलाकारांची मराठी पाऊल पडते पुढे ह्या सिनेमातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहाणं औत्सुक्याचे ठरेल.

ह्या चित्रपटाचा आशय आणि मूळ उद्देश पाहून पुणे येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी हे चित्रपटाला जाहीर पाठींबा दिलेला आहे. त्याच बरोबर मगरपट्टा टाऊनशीप डेव्हलपमेन्ट अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे संस्थापक-संचालक  सतीश मगर यांचा उदात्त स्नेहभाव व आशीर्वाद ह्या चित्रपटाला लाभला असून त्यांनी ह्या चित्रपटाला शुभेच्छा दिलेल्या आहेत.  तसेच खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंच पुणे च्या वतीने या चित्रपटाला शुभेच्छा देण्यसाठी  विजया  मानमोडे यावेळी उपास्थित होत्या.

मराठी पाऊल पडते पुढे हे शीर्षक वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढते. असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या अनेक मराठी दिग्गजांनी जगाच्या नकाशावर आपली पताका डौलाने फडकवली. पण, तरीही एकूण मराठी भाषिकांमध्ये व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करण्याची वृत्ती नसते, असा एक ढोबळ समज आहे. अर्थात, त्याला अनेक कारणे असू शकतात. स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे, आणि तो करण्यासाठी आजचा मराठी तरूण कुठेही कमी नाही. फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची गरज आहे. ही गरज, प्रेरणा आणि उर्जो प्रभावी मनोरंजनाद्वारे देण्यासाठी तसेच समस्त मराठी मन आणि मनगटे मजबूत करण्यासाठी निर्माता प्रकाश बाविस्कर यांची निर्मिती व शिवलाईन फिल्म्सची प्रस्तुती असलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 

निर्माते प्रकाश बाविस्कर एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या निव्वळ नफ्यातील दहा टक्के रक्कम कलाकारांना आणि उर्वरीत भाग हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी आणि वृध्दाश्रमासाठी देऊ केला आहे,  त्याचबरोबर चित्रपटाचे लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५ ४४ ११ ३३ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन निर्माता  प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे.

अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतकार समीर खोले यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत.  तसेच चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading