Saturday, October 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मी मुंबईतच आहे, आमदारांची कोणतीही बैठक बोलावली नाही – अजित पवार

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संदर्भात  माध्यमांमध्ये राजकीय भूकंपाच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अखेरीस आज सायंकाळी अजित पवार यांनी स्वतः एक निवेदन जाहीर करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी. अजित पवार यांनी जाहीर केलेल्या या निवेदनामुळे सर्व राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading