Saturday, October 17, 2026
Latest NewsPUNE

शुध्द पाणी मिळणे नागरिकांचा मुलभूत हक्क – नामदेव काटकर


पुण्यातील संस्थेने रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी जलशुध्दीकरण प्रकल्प उभारला
पुणे : अशुध्द पाण्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. पिण्याचे पाणी शुध्द मिळणे हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. पण, अनेक कारणामुळे आजही नागरिकांना शुध्द पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजार होतात. पाण्यामुळे होणा-या आजारापासून नागरिकांची सुटका होण्यासाठी वडगाव शेरी तील कर्तव्य फाउंडेशने लिऑनस डिजीटल टेक्नॉलॉजी प्रा. लि यांच्या माध्यमातून किल्ले रोहिडेश्वर गडाच्या पायथ्याशी बाजारवाडी (ता. भोर ) येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली असल्याचे लिऑन्स डिटीजलचे प्रा. लि. कंपनीचे संचालक नामदेव काटकर यांनी सांगितले.

या प्रकल्पाचे उद्घाटन लिऑन्स डिजीटल प्रा. लिमिटेड कंपनी, पुणे चे संचालक नामदेव काटकर, कर्तव्य फाउंडेशनचे अॅड. माऊली शिंदे , मातोश्री सेवा प्रतिष्ठानचे दत्तात्रय सोंडेकर जीवन संध्या सिनेमा एक्झिक्यूटिव्ह प्रोड्युसर सुशांत माळी, अर्जुन खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सिताबाई मोहन गुरव, ग्रामपंचायत सदस्य रुपाली जाधव,उत्तम खोपडे, ज्ञानेश्वर शिंदे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शिंदे, शिवाजी शिंदे, माजी सरपंच तुषार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काटकर म्हणाले की, आपण २१ व्या शतकामध्ये विज्ञानाने खुप प्रगती केली आहे. पण, आजही अशुध्द पाण्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ग्रामीण भागातील गाव आणि शाळामध्ये शुध्द पाणी मिळावे यासाठी गावक-यांनी लोकसहभागातून जलशुध्दीकरणाचे प्रकल्प उभारले पाहिजे. पाणी जिरवा, पाणी आडवा आणि जलसंधारणाचे काम करावे. ज्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही. कर्तव्य फाउंडेशन आणि लिऑन्स डिजीटल प्रा. लिमिटेड कंपनीने गावात 1 हजार लिटरचे जलशुद्धीकरण केंद्र बसवले असून या शुद्ध पाण्याचा गडावर येणाऱ्या पर्यटकांना, शाळेतील मुलांना, नागरिकांना उपयोग होणार आहे. असे मत सिताबाई गुरव सरपंच बाजारवाडी भोर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी चंद्रकांत शिंदे, आनंदा शिंदे, बाळू चव्हाण, रामचंद्र मानकर, शुभम नेटके, शंभू हंबीर, नितीन भागवत, गोविंद खोपडे, वैभव खोपडे,योगेश गुरव, चंद्रकांत भागवत व बहुसंख्येने तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्तव्य फाउंडेशन आणि मातोश्री सेवा प्रतिष्ठानचे दत्तात्रय सोंडेकर यांच्या वतीने किल्ले रोहिडेश्वर गडावरील श्री. काळभैरवनाथ मंदिरात दोन सौर दिवे देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading