Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मोदी-शहा, फडणवीसांना ‘सत्तेची मस्ती’..! स्वकर्तुत्व नसल्याने, गैरमार्गांचा वापर व आमदार-फोडाफोडीत रस..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : “जनतेप्रती कर्तव्य तत्पर व ऊत्तरदायी होऊन, दिलेली आश्वासने पुर्ण करून, वाढत्या महागाई व बेरोजगारीच्या समस्या दुर करून स्वपक्षाचा जनाधार व विश्वसनियता वाढवण्या ऐवजी”, जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, तरुणांच्या प्रश्नांना क्षमतेने सामोरे जाण्याचे टाळून, विरोधी पक्षाच्या सदस्यांचीच् घाऊक खरेदी करण्याची व सरकारी आयुधे वापरून, त्यात वेळ व शक्ती खर्चकरून, विरोधकांना नामोहरम करण्याच्या पलायनवादी वृत्तीने पछाडलेल्या भाजप’चा देशातील सत्ताकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येईल.. त्यामुळे मोदी-शहा-फडणवीसांच्या ‘सत्तेची मस्ती’ अजुन वर्षभर जनतेस सहन करावी लागेल अशी उपरोधीक टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

असंवैधानिक, न्यायप्रविष्ट सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच “मविआ’तील आमदार भाजप मध्ये येण्याच्या” वक्तव्याचा समाचार, काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी घेतला.

राज्यसरकार तर्फे दिला जाणाऱ्या महाराष्ट्र भुषण’ पुरस्कारांच्या (सरकारी खर्चाने होत असलेल्या जाहीरातींमंध्ये) वा कार्यक्रम पत्रीकेत विरोधी पक्ष नेत्याचे नांव वा उल्लेख नसणे ही सरकारची नैतिक दिवाळखोरी व मनमानी असल्याची टिका देखील गोपाळदादा तिवारी यांनी केली..! विरोधी पक्षांची टिका ही ‘सत्तापक्षाच्या कामकाजामध्ये सुधारणा होण्यासाठी’च समजली जात असते. लोकशाहीत सत्तेवर आल्यावर लोकहीताची कामे करणे व दिलेली आश्वासने पुर्ण करणे, व विरोधकांस टिकेची संधी न देणे हेच खरे राजधर्माचे पालन करणे असते..! देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्यात व लूट थांबवण्यात सपशेल वा जाणीवपुर्वक अपयशी ठरलेल्या भाजपने सु. ७ राज्यातील सरकारे केंद्रातील महाशक्तीच्या जोरावर पाडली आहेत. वास्तविक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा खाली, सलग (२०१४ ते १९) ५ वर्षे सत्ता राबवलेल्या भाजप’ला, राज्यातील जनतेने २०१९ ला, आहे तेवढ्या (१२६) जागेंचा कौल देखील दिलेला नाही, हे त्या वेळीच स्पष्ट झाले. २०१४ मध्ये १२६ जागा मिळवणाऱ्या भाजपला २०१९ ला मात्र १०५ जागा मिळाल्या मात्र त्यातही ‘प्रथम पासुन भाजप’चे असलेले सु ८० आमदारच आले, व (काँग्रेस-राष्ट्रवादी’ते प्रस्थापित सु २६ आमदार हे निवडणुकीचे तोंडावर (२०१९ मध्ये) भाजपवासी झाले.. त्यामुळे सु. २६ ची आमदारांची भर पडून देखील, भाजपा १०३ पुढे जाऊ शकली नाही हा भाजपचा नैतिक पराभव होता..! त्यामुळे कामकाज करून स्वपक्षाचा जनाधार वाढवू न शकणाऱे, सत्ताकाळातील पापकृत्यांमुळे ‘संभाव्य शिक्षा-कारावास टाळण्यासाठी’ अहंकारी वृत्तीने सत्तेतच रहाण्याच्या प्रयत्नात, देशाचे अपरिमित नुकसान करीत असल्याचा आरोप देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading