हिंडेनबर्ग प्रकरणात जेपीसीची मागणी निरर्थक – शरद पवार
नवी दिल्ली : सध्या देशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात हिंडेनबर्ग प्रकरणात जेपीसीकडून चौकशी व्हावी यासाठी देशात गदारोळ सुरु आहे. गुरुवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अखेर गदारोळातच झाले. देशातील विरोधी पक्षाचा मोठा नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे बहघितले जाते. अशात त्यांनी आता
जेपीसी वरून मोठे विधान केले असून त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, हिंडेनबर्ग प्रकरणात एससी समितीच योग्य असून जेपीसीची मागणी निरर्थक असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गेल्या सहा दशकांपासून भारतीय राजकारणात सक्रिय आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही शरद पवार याना आदर देतात. कोणत्याही अडचणीच्या मुद्यावर शरद पवार हे सत्ताधारी आणि विरोधकांना आपापल्या मर्यादा दाखवतात.
त्यांनी मुलाखतीत म्हटले की, भाजप एकीकडे एका व्यक्तीच्या विधानावर अतिरेक होत असल्याची टीका करते आणि दुसरीकडे हिंडेनबर्गबाबत जेपीसीची मागणीही अनावश्यक आहे असे सांगते. जेपीसीमध्ये संसदीय समितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत आहे, त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही, असे त्यांचे मत आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीतून सत्य बाहेर येण्याची शक्यता जास्त आहे.
हिंडेनबर्ग प्रकरणाबाबत शरद पवार म्हणाले, विरोधकांनी एका फर्मने दिलेल्या रिपोर्ट ला अधिक महत्त्व दिले. या फर्मची पार्श्वभूमी कोणाला माहीत नाही, त्यांचे नावही आम्ही ऐकलेले नाही. या प्रकरणात एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते.
अदानी ची स्तुती करत ते म्हणाले की , आम्ही राजकारणात आलो तेव्हा टाटा, बिरला यांच्यावर आरोप करायचो. आम्हाला नंतर समजले की, त्यांनी देशासाठी किती मोठे योगदान दिले आहे. आत्ताचे टाटा-बिरला हे अडाणी व अंबानी आहेत. अदानींनी विद्युत क्षेत्रात मोठे काम केले आहे.
