Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सीएनजी मध्ये ८ तर पीएनजी ५ रुपये दरकपात

मुंबई : महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅसचा दर निश्चित केल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने काही तासांतच सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ८ रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. त्याशिवाय स्वयंपाकासाठी वापरण्यात येणा-या पीएनजी गॅसच्या दरात ५ पाच रुपये प्रतिएससीएमची (स्टँडर्ड क्युबिक मीटर) कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर ही दर कपात लागू झाली.

मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. आता दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. ८ एप्रिलपासून महानगर गॅस लिमिटेडकडून वितरीत होणा-या सीएनजीचा दर प्रतिकिलो ७९ रुपये असणार आहे तर पीएनजीचा दर ४९ रुपये एससीएम इतका असणार आहे. फेब्रुवारी महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. त्यावेळी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात करण्यात आली होती.

केंद्र सरकारने पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर आज सीएनजी गॅसचे दर जाहीर केले. एप्रिल महिन्यासाठी ७.९२ डॉलर प्रति एमएमबी ३४ इतकी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी हे दर ६.५ डॉलर इतके असणार आहेत.


पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी आणि पीएनजी स्वस्त झाला असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. पेट्रोलच्या तुलनेत ४९ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत १६ टक्के सीएनजी स्वस्त असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे तर एलपीजीच्या तुलनेत पीएनजीचा दर हा २१ टक्क्यांनी स्वस्त आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading