Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

श्रीप्रयागधाम चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलला अत्याधुनिक एक्सरे मशिन सुपूर्द

पुणे : महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत श्रीप्रयागधाम चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल संस्थेस १७ लाख रुपयांचे अत्याधुनिक डिजिटल एक्सरे मशीन देण्यात आले. यामुळे इतरत्र ज्या एक्सरे साठी ६०० ते १००० रु खर्च आहे, तो रुग्णांना केवळ ५० रुपयात उपलब्ध झाला आहे.

उरळी कांचन येथे संस्थेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाला क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कृष्णकुमार बूब, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, संचालक मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, दर्शन मुंदडा, क्लीन सायन्सचे सहव्यवस्थाक विठ्ठल थोरात आदी उपस्थित होते.

कृष्णकुमार बूब म्हणाले, मागील २७ वषार्पासून ही संस्था रुग्णालय क्षेत्रात सक्रिय आहेत. वर्षभरात ६ हजार पेक्षा अधिक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व उपचार निदान संस्थेमार्फत केले गेले आहे. आरोग्यमंदिरात सदैव रुग्णांची मोठी रेलचेल असते. पुणे व परिसरातील रुग्णांना या सुविधेचा मोठा फायदा होत आहे.

शेखर मुंदडा म्हणाले, श्रीप्रयागधाम संस्थेच्या मुळाशी अध्यात्म आहे. त्यामुळेच रुग्णसेवेचे मोठे व्रत संस्था लिलया पेलू शकते. पुढील काही दिवसात एमओयु करुन महा एनजीओ फेडरेशन स्व खर्चाने गरजू रुग्णांना पूर्ण उपचार उपलब्ध करुन देणार आहे. निश्चित येत्या काळात गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading