Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि नॅशनल ब्लॅक चेंबर ऑफ कॉमर्स यांचा सामंजस्य करार


पुणे : दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI)आणि नॅशनल ब्लॅक चेंबर ऑफ कॉमर्स (NBCC) USA यांच्यात सामंजस्य करार दिल्ली येथे नुकताच पार पडला .या करारामुळे भारतातील दलीत उद्योजकांना एक वेगळ्या प्रक्रारच्या संधी भविष्यात निर्माण होतील .G 20 च्या अपेक्षेनुसार हा करार झाला असल्याचे डीक्की चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी पुण्यात माहिती दिली .
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (DICCI) हे संपूर्ण भारतभर सभासद असलेले चेंबर ऑफ कॉमर्स आहे. ही दलीत उद्योजकांना एकत्रित करणारी त्यांना सर्व प्रकारे सहाय्य करते . तसेच उद्योजकता, क्षमता निर्माण करण्यास व व्यवसायात विविध संधी उपलब्ध करण्यास संस्था मदत करते .दलीत उद्योजकांना अनेक छोट्या मोठ्या संधी उपलब्ध करून अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना करून देते. सामाजिक-आर्थिक विकासात गुंतलेली एक उद्योग संस्था तसेच दलीत युवकांना उद्योजक बनवण्याचे स्वप्न आणि मार्ग निर्माण करण्याचे काम डीक्की ही संस्था करीत आहे .
DICCI गेल्या 18 वर्षांपासून सर्वसमावेशक विकासाचा समर्थक आहे आणि वंचित व उपेक्षित दलीत उद्योजकांचे हितासाठी धोरणात्मक पुढाकार घेऊन संधी निर्माण करीत असते . DICCI ने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांच्या #आझादीका अमृतमहोत्सवाच्या स्मरणार्थ आपल्या कार्यक्रमांमध्ये नवीन आयाम जोडण्याचा संकल्प केला आहे. समविचारी संस्थांसह परदेशात ही सभासद निर्माण करणे आणि त्यांचे विविध समस्या सोडवणे हे प्रमुख कार्य आणि उद्दिष्ठ आहे .

DICCI चे सर्व उद्योजक आणि सभासद बी20 सक्रिय समुदाया मध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
G20 प्रक्रियेची विविधता आणि सर्वसमावेशकता.
जगभरातील वंचित उद्योजकांना प्रभावी साधन व आधार देणारे किंवा धोरणात्मक उपक्रम राबवणे म्हणजे ‘पुरवठादार विविधता’. हे मुख्यत्वे पुरवठा साखळींमध्ये अशा उद्योजकांना सक्रियपणे स्वीकारणे आणि एकत्रित करणे याबद्दल आहे. यामुळे आर्थिक उलाढाल व्यवसाय वाढीचा विस्तार करणे, तसेच छोट्या व्यवसायांमध्ये नोकऱ्याही निर्माण होतात.

NBCC, कॉर्पोरेट आणि आंतरराष्ट्रीय संबंध संचालक श्री फ्रेडरिक अँडरसन यांच्या नेतृत्वाखाली NBCC, USA मधील 7 सदस्यीय व्यावसायिक शिष्टमंडळाने DICCI नॅशनल कॉन्फरन्समध्ये भाग घेतला आणि देशभरातील DICCI व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधला आणि MOU समजस्या करारावर स्वाक्षरी केली.

पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष, DICCI यांनी सांगितले की, हा सामजस्य करार दोन्ही संस्थांना उद्योगाच्या विश्वात महत्वाचा ठरणारा आहे . या संस्थेच्या व कराराच्या माध्यमातून उद्योग सक्षम करणे आणि व्यवसाय विकासाच्या अनेक पैलूंमध्ये सहकार्य, सहयोग आणि भागीदारी सुलभ करेल ज्यामुळे एक चिरस्थायी संबंध निर्माण होऊन संस्थात्मक असे अपेक्षित कार्य होणार असून एक महत्त्वाचा इतिहास निर्माण होईल .

या एकरूपतेमुळे भारत आणि यूएसए यांच्यातील सहकार्याला पुढील वर्षांमध्ये शाश्वत संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे पद्मश्री रविकुमार नारा, राष्ट्रीय अध्यक्ष, DICCI यांनी सांगितले.

नॅशनल ब्लॅक चेंबर ऑफ कॉमर्स (NBCC) ही 30 वर्षे जुनी संस्था आहे आणि ती आफ्रिकन अमेरिकन समुदायांना उद्योजकतेद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करते. याचे मुख्यालय वॉशिंग्टन डीसी येथे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading