Tuesday, June 16, 2026
BusinessLatest NewsPUNE

क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी रणजित नाईकनवरे यांची बिनविरोध निवड

पुणे : क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे यांची बिनाविरोध निवड करण्यात आली आहे. उद्या, शनिवार दि. १ एप्रिल रोजी मावळते अध्यक्ष अनिल फरांदे यांच्याकडू रणजीत नाईकनवरे हे क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.

नुकत्याच झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत नाईकनवरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोच्या उपाध्यक्षपदी अमर मांजरेकर, मनीष जैन, आदित्य जावडेकर, राजेश चौधरी, विनोद चांदवानी, अरविंद जैन यांची तर अश्विन त्रिमल आणि तेजराज पाटील यांची यांची अनुक्रमे सचिवपदी व सह-सचिवपदी निवड करण्यात आली आहे. आय पी इनामदार हे संघटनेचे नवीन कोषाध्यक्ष असतील. कपिल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा जनसंपर्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबरोबरच संघटनेच्यावतीने अखिल अगरवाल हे रेरा संदर्भातील विषय तर मनीष कनेरिया हे पर्यावरणाशी निगडीत विषय हाताळतील.

व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यपदी बांधकाम व्यावसायिक जे. पी. श्रॉफ, संजय देशपांडे, अखिल अगरवाल, मनीष कनेरिया, संतोष कर्णावत, सतीश अगरवाल, सपना राठी, केतन रुईकर, दिलीप मित्तल, अनुप झमतानी, सिद्धार्थ मूर्ती, पुनीत ओसवाल, अभिषेक भटेवरा, वसंत काटे, ईशान मगर, कपिल त्रिमल यांची निवड करण्यात आली आहे.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असून नाईकनवरे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीचे ते संचालक आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी विषयामध्ये पदवी मिळविली आहे. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण व फायनान्स विषयात एमबीए अर्थात मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे. अनेक सामाजिक व सेवाभावी कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे.

क्रेडाई पुणे मेट्रो विषयी – क्रेडाई पुणे मेट्रो ही पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील खासगी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असून १९८२ साली तिची स्थापना झाली आहे. तेव्हापासून गेली ४० वर्षे संस्था ही बांधकाम व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसाठी त्यांचे प्रतिनिधित्व करते. क्रेडाई पुणे मेट्रो हा कॉन्फिडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेचा पुणे विभाग आहे. देशभरातील सुमारे १३ हजार पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक या संघटनेचे सदस्य आहेत. देशातील २१ राज्यांमध्ये असलेल्या २१७ शाखांच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज चालते. ५०० हून अधिक महत्त्वाचे बांधकाम व्यवसायिक आणि १५०० रेरा सभासद यांचा समावेश क्रेडाई पुणे मेट्रोमध्ये आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ७० टक्के बांधकाम करणाऱ्या अशा प्रमुख बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading