भाषा, मानव्यविद्या, समाजशास्त्रात उदयोन्मुख ट्रेंड विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
पुणे : पूना कॉलेज कला शाखा व आयक्यू ए.सी. च्या संयुक्त विद्यमाने “भाषा,मानव्यविद्या, समाजशास्त्रात उदयोन्मुख ट्रेंड” विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. धोंडीराम पवार यांनी भाषा, मानव्यविद्या शाखेत उदयोन्मुख ट्रेंडवर आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आफताब अनवर शेख यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने प्रत्येक विषयाच्या उपयोगितेवर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे डॉ. प्रिया ए, केरल,डॉ. आमिर अली, जेएनयू,डॉ. शिल्पागौरी गणपूले, शमीम तारिक यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. उपप्राचार्य मोइनूद्दीन खान यांनी सर्वांचे स्वागत केले. संयोजक डॉ. जोहेब हसन यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक केले.
डॉ. परवेज़ नज़ीर,अलीगढ़, प्रा. सैयद अरीश अहमद,दिल्ली, डॉ. जगदीश सोनवणे,नेवासा यांनी देखील मार्गदर्शन केले. ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने महाराष्ट्र,गुजरात, त्रिपुरा,उत्तर प्रदेश, जम्मू कश्मीर,बिहार, पश्चिम बंगाल येथून आपले शोधालेख प्रस्तुत केले. चर्चासत्रात १४० जणांनी सहभाग नोंदविला. डॉ. अश्विनी पुरुड़े, प्रा. सिमरन कौर,प्रा. मिलिंद पाटिल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.गुलनवाज़ उस्मानी तथा प्रा. जमीर सैयद यांनी आभार मानले.