fbpx

एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी अ संघाला विजेतेपद   

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ संघाने पीवायसी ब संघाचा  16-09 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
 
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत इलाईट डिव्हिजनमध्ये अंतिम फेरीत सामन्यात 110 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या राजेश कासट व जयंत कढे यांनी पीवायसी ब संघाच्या अमित नाटेकर व प्रशांत गोसावी यांचा टायब्रेकमध्ये 6-5 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. 100 अधिक गटात हिमांशू गोसावीने केदार शहाच्या साथीत राधिका मांडरे व सुंदर अय्यर यांचा 6-1 असा तर, 90 अधिक गटात पीवायसी अ संघाच्या अनूप मिंडा व ऋतू कुलकर्णी यांनी पीवायसी ब संघाच्या योगेश पंतसचिव व अनिरुद्ध साठे या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी राजेश कासट ठरला.
तिसऱ्या  व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शैलेश पटवर्धन, पंकज यादव, संग्राम चाफेकर, वैभव अवघडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एफसी गन्स अँड रोझेस संघाने टेनिसनट्स संघाचा सुपर टायब्रेकमध्ये 29-26 असा संघर्षपूर्ण पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.  स्पर्धेतील विजेत्या पीवायसी अ संघाला करंडक व 25000 रुपये, तर उपविजेत्या पीवायसी ब संघाला करंडक व 15000 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाच्या एफसी गन्स अँड रोझेस संघाला करंडक व 10000 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागु, क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, हिमांशू गोसावी, अवनी व तनया गोसावी, अभिषेक ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:  इलाईट डीव्हिजन:
पीवायसी अ वि.वि.पीवायसी ब 16-09(110 अधिक गट: राजेश कासट/जयंत कढे वि.वि.अमित नाटेकर/प्रशांत गोसावी 6-5; 100 अधिक गट: हिमांशू गोसावी/केदार शहा वि.वि. राधिका मांडरे/सुंदर अय्यर 6-1; 90 अधिक गट: अनूप मिंडा/ऋतू कुलकर्णी वि.वि.योगेश पंतसचिव/अनिरुद्ध साठे 6-3; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि. अमोघ बेहेरे/रोहित शिंदे); सामनावीर: राजेश कासट;

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत: 

एफसी गन्स अँड रोझेस सुपर टायब्रेकमध्ये वि.वि. टेनिसनट्स 29-26(110 अधिक गट: संजय रासकर/पुष्कर पेशवा पराभुत वि.अमित किंडो/श्रीशाह भट 4-6; 100 अधिक गट: शैलेश पटवर्धन/पंकज यादव वि.वि.सुनील लुल्ला/जितेंद्र जोशी 6-3; 90 अधिक गट: धनंजय कवडे/देशपांडे पराभुत वि.आलोक नायर/संदीप बेलुडी 3-6; खुला गट: संग्राम चाफेकर/वैभव अवघडे वि.वि.जॉय बॅनर्जी/रवी कोठारी 6-4; सुपरटायब्रेक: संग्राम चाफेकर/वैभव अवघडे वि.वि.संदीप बेलुडी/जॉय बॅनर्जी 10-7). सामनावीर: संदीप बेलुडी;

Leave a Reply

%d bloggers like this: