fbpx

हनीवेलच्या ‘आनंद गाव’ प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय आनंद दिनानिमित्त फुलगाव ग्रामपंचायतीतील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणले

पुणे :हनीवेलची (NASDAQ:HON) सामाजिक उपक्रम करणारी शाखा हनीवेल होम टाऊन सोल्युशन्स इंडिया फाऊंडेशन (HHSIF) ने त्यांच्या ‘आनंद गाव’ या प्रकल्पांतर्गत फुलगाव या पहिल्या गावाचा पुनर्विकास यशस्वीपणे पूर्ण केला. पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयी पुरवून हनीवेल संस्थेच्या आसपासच्या ग्रामीण समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी राबवला जाणार हा प्रकल्प हनीवेल कंपनीचा एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील फुलगाव ग्रामपंचायतीला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ‘आनंद गाव’ प्रकल्पांतर्गत पहिले गाव म्हणून दत्तक घेण्यात आले.

आज यूनायटेड नेशन्सच्या (UN) ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिना’च्या निमित्ताने  हनीवेलने ‘आनंद गाव’ हस्तांतर समारंभ आयोजित केला. हे हनीवेल होम टाऊन सोल्युशन्स इंडिया फाऊंडेशन (HHSIF) च्या समग्र, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास या विषयासंबंधित असणाऱ्या लक्ष्यांतर्गत आहे.

एचएचएसआयएफ (HHSIF) ने अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन (AIF) सहभागीदारीने फुलगाव येथील एचएआयएल (HAIL) प्लांटमध्ये स्थानिक नेतृत्वाच्या पाठिंब्याने एचएचएसआयएफ (HHSIF) आणि अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन (AIF) च्या कर्मचाऱ्यांनी ‘गरज मूल्यांकन’ (need assessment) केले आणि गावकऱ्यांची गरज समजून घेण्यासाठी पंचायतीच्या सदस्यांशी संवाद साधला.

या मूल्यांकनाच्या अभ्यासावरून आणि गावकऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून हनीवेलने शाळेमध्ये अजून सुधारणा करण्यासाठी संसाधने नियोजित केली, गावात सौर पथदिवे लावले, पंचायत कार्यालयात सौर पॅनल दिले आणि शाळा ऊर्जाकार्यक्षम बनवली.

या सुधारित सुविधांमुळे ३०० पेक्षा जास्त ग्रामीण मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल आणि १०,००० हून अधिक लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. हनीवेल कंपनीच्या वतीने हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आशिष गायकवाड यांनी नूतनीकरण केलेल्या शाळेचे आणि इतर सुविधांचे अनावरण करून फुलगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ. मंदाकिनी साकोरे यांच्याकडे त्याचे हस्तांतरण केले.

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आशिष गायकवाड म्हणाले, “ आम्हाला ‘आनंद गाव’ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन (AIF) आणि फुलगाव येथील एचएआयएल (HAIL) प्लांटमधील स्थानिक नेतृत्वासोबत भागीदारी केल्याचा अभिमान वाटतो. या प्रकल्पाद्वारे आम्ही शाळेत सुधारणा केली, गावात सौर पथदिवे लावले, पंचायत कार्यालयाला आणि शाळेला ऊर्जा कार्यक्षम बनवण्यासाठी सौर पॅनल दिले; ज्याचा जवळपास १०,००० पेक्षा जास्त लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या दिवशी या सुविधा ग्रामपंचायतीला सुपूर्त करणे हे आमचे सौभाग्य आहे. आम्ही असे मानतो की, ज्या समुदायामध्ये उद्योजक काम करतात, विशेषतः ग्रामीण भागात राहणारे समुदाय, त्या समुदायांना मदत करून पाठिंबा देणे हे व्यावसायिकांची जबाबदारी आहे. हनीवेल शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्य निर्माण करण्यासाठी समर्पित आहे आणि ‘आनंद गाव’ उपक्रम या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

हनीवेल कंपनी ज्या समुदायांमध्ये कार्यरत आहे तेथील लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेतील आणि प्रयत्नातील ‘आनंदगाव’ हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन (AIF) च्या राष्ट्र संचालिका मिनाक्षी बत्रा म्हणाल्या, “आमची हनीवेलसोबतची भागीदारी त्यांच्या ‘आनंद गाव’ या प्रकल्पांतर्गत फुलगाव या पहिल्या गावाच्या पुनर्विकासाला मदत करेल. या सहभागीदारीतून लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारून समग्र आणि शाश्वत सामाजिक विकासाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: