fbpx

चौथ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २५ मार्च पासून आयोजन

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे चौथ्या ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ मार्च ते ९ एप्रिल २०२३ या कालावधीत सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, ही स्पर्धा एस. बालन यांच्या ४ एप्रिल रोजी असणार्‍या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेली आहे. पुण्यातील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण १६ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष आहे. स्पर्धेत एकूण चार लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेव्दारे स्थानिक व पुण्यातील विविध क्लबमधील खेळाडुंसाठी आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी निर्माण होत आहे. खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य समृध्दीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेव्दारे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना संधी मिळत असून आपल्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुभव मिळणार असल्याचे पुनित बालन यांनी सांगितले.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत पुनित बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्सिरीच, वालेकर स्पोर्ट्स फाऊंडेशन, हेज अँड सॅच्स् क्लब, एमईएस क्रिकेट क्लब, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी-औरंगाबाद, किंग्ज् क्रिकेट क्लब, न्युट्रीलिशस, इऑन इलेव्हन, इव्हॅनो इलेव्हन, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब, अष्टपैलू स्पोर्टस् फाऊंडेशन, साईदीप हिरोज् इलेव्हन, पुणे पोलिस आणि ऑल मॉन्स्टर्स अशा १६ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेत एकूण चार लाख रूपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये व करंडक मिळणार आहे.

या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर ठरणार्‍या खेळाडूला रोख पाच हजार रूपये अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

गतवर्षी झालेल्या स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लब संघाने विजेतेपद तर, गेम चेंजर्स संघाने उपविजेतेपद मिळवले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: