fbpx

आभा वांबुरकर आणि रागेश्री वैरागकर यांना सरदेशमुख पुरस्कार

पुणे – दर्शनम् न्यास आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल यांच्या वतीने दर वर्षी सरदेशमुख महाराज पुरस्कार आणि पं. चंद्रकांत सरदेशमुख पुरस्कार असे दोन पुरस्कार एका अनुभवसिद्ध कलाकारास आणि एका युवा कलाकारास देण्यात येतात. यंदाच्या वर्षी ह्या पुरस्कारांसाठी अनुक्रमे कथक कलाकार आभा वांबुरकर आणि युवा गायिका रागेश्री वैरागकर यांची निवड करण्यात आली आहे.माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार दिले जातील आणि नंतर दोन्ही कलाकार मैफल सादर करतील. शुक्रवार, दि. २४ मार्च २०२३ रोजी सायं. ६ वा. विद्यापीठातील संत नामदेव सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: