fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार पाडव्याचा गोडवा

ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने साजरा होणार गुढीपाडवा

चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा होणार पाडव्याचा सण…

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. ठरलं तर मग मध्ये अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने सायली आणि अर्जुन गुढीची पूजा करणार आहेत.

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे. यावर्षी मात्र पश्या नाही त्यामुळे पूजा होणार की नाही अश्या विचारत असताना पश्या गुपचूप पुजेची तयारी करुन जातो. त्यामुळे सरु वहिनीला खात्री आहे की पश्या आसपासच आहे. यंदा पश्यासाठी मोरे कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारणार आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप गौरीसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे. दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे लक्ष्मीसोबत जयदीप-गौरी गुढीपाडवा साजरा करणार आहेत. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतही कानेटकर कुटुंबाने आनंदाची गुढी उभारली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading