fbpx

तुम्‍हाला माहित आहे का, अंगूरी भाभी तिच्‍या पहिल्‍याच सीनचे शूटिंग करत असताना कॅमेराची लेन्‍स त्‍वरित तुटली?

 

एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’ने नुकतेच आठ वर्ष आणि २००० एपिसोड्स पूर्ण केले. आम्‍ही मालिकेमधील अत्‍यंत लोकप्रिय अंगूरी भाभी ऊर्फ शुभांगी अत्रे यांच्‍यासोबत मालिकेसोबत आणि इंडस्‍ट्रीमधील त्‍यांच्‍या अविश्‍वसनीय प्रवासाबाबत गप्‍पागोष्‍टी केल्‍या. त्‍यांनी आमच्‍यासोबत केलेल्‍या गप्‍पागोष्टी पुढीलप्रमाणे:

  • आठ वर्षांचा सुवर्ण टप्‍पा गाठल्‍याबद्दल अभिनंदन!

खूप खूप धन्‍यवाद. आम्‍हा सर्वांसाठी हा खास क्षण आहे. माझ्यावर विश्‍वास दाखवण्‍यासाठी आणि ही संधी देण्‍यासाठी मी चॅनेल आणि आमचे निर्माते संजय कोहली व बिनायफर कोहली यांचे आभार मानते. मी या मालिकेला प्रचंड यशस्‍वी करण्‍यामध्‍ये सतत पाठिंबा व प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रेमळ प्रेक्षकांचे अभिनंदन करते. इतकी वर्षे उलटून गेली यावर माझा विश्‍वासच बसत नाही. मालिकेला प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहून अद्भुत वाटते. या मालिकेने मला मान्‍यता, प्रेम, प्रसिद्धी आणि कायमस्‍वरूपी स्‍मरणात राहतील अशा आठवणी दिल्‍या आहेत. मला मालिका ‘भाबीजी घर पर है’ टीमचा भाग असल्‍याने धन्‍य वाटण्‍यासोबत तितकाच अभिमान वाटत आहे. टीमची समर्पितता व अथक मेहनतीचे फळ मिळाले आहे.

  • तुम्‍ही हा प्रवास इतका लांबवर येईल अशी अपेक्षा केली होती का?

प्रामाणिकपणे सांगायचे तर हो. अंगूरी भाभीच्‍या भूमिकेत माझा प्रवास विविध स्‍तरावर सुरू झाला. ही भूमिका प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरली आहे. अगोदरच लोकप्रिय असलेल्‍या भूमिकेत सामावून जाणे आव्‍हानात्‍मक, तसेच लाभदायी आहे. याबाबत माझ्या भावना मिश्र होत्‍या. मी प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय असण्‍यासोबत प्रतिभावान स्‍टार कलाकार असलेल्‍या मालिकेचा भाग असण्‍यास उत्‍साहित होते, सोबत माझ्यावर प्रेक्षकांच्‍या अपेक्षांवर खरे उतरण्‍याची जबाबदारी देखील होती. पण मला स्‍वत:ला खात्री होती की, मी अंगूरी भाभीच्‍या भूमिकेला नव्‍या उंचीवर घेऊन जाईन आणि या आयकॉनिक, लोकप्रिय व संस्‍मरणीय भूमिकेप्रती माझे सर्वोत्तम योगदान देईन. मला आनंद होत आहे की, प्रेक्षकांनी खुल्‍या मनाने माझा स्‍वीकार केला आहे. प्रेक्षकांचे प्रेम व आपुलकीने माझ्यामध्‍ये स्‍वत:प्रती व माझ्या कामाप्रती विशिष्‍ट स्‍थान निर्माण करण्‍याचा विश्‍वास जागृत केला.

माझा पहिला दिवस आणि पहिल्‍या सीनचे शूटिंग मला आजही आठवते. मी अंगूरी म्‍हणून माझा पहिला टेक देताच कॅमेराची लेन्‍स तुटली. सुरूवातीला मला वाईट वाटले आणि तणाव देखील आला, माझी प्रतिक्रिया होती, ‘अरे देवा, हे काय झाले?’. पण त्‍यानंतर सर्व कलाकार व टीमने कौतुक केले, जे मोठे सरप्राइज होते. ते म्‍हणाले, ‘कॅमेऱ्याची लेन्‍स तुटणे हा शुभ संकेत आहे आणि चांगली सुरूवात आहे, तुम्‍ही खूप लांबचा पल्‍ला गाठाल’. मला गेस्‍चर व हे शब्‍द ऐकून खूप बरे वाटले. माझा दिवस सार्थ ठरला आणि शूटिंगच्‍या दिवसातील सर्वात संस्‍मरणीय आठवण आहे.

  • एखादी घटना सांगाल, ज्‍यामुळे तुम्‍हाला ही भूमिका साकारण्‍याचा अभिमान वाटला?

अशा अनेक घटना आहेत, ज्‍यामुळे एकाच घटनेबाबत सांगणे सोपे नाही. पण मला तुम्‍हाला काहीतरी सांगायचे आहे. अंगूरीची भूमिका साकारण्‍याचा निर्णय घेणे माझ्यासाठी स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे ठरले. मला आठवते की, मी एका पुरस्‍कार सोहळ्याला गेले होते, जेथे कोणीतरी मला सांगितले की, गायिका आशा भोसले जी देखील त्‍या कार्यक्रमामध्‍ये आल्‍या आहेत आणि त्‍या मला शोधत आहेत. मी त्‍यांना भेटले आणि माझे कौतुक करत त्‍या म्‍हणाल्‍या की, ‘मी तुमची मालिका पाहते आणि मला तुमची भूमिका अंगूरी खूप आवडते’. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, ‘असे वाटते की, ही भूमिका तुमच्‍यासाठीच तयार करण्‍यात आली आहे आणि तुम्‍ही त्‍या भूमिकेसाठी योग्‍य आहात. तुमच्‍यापेक्षा इतर कोणीच अंगूरीची भूमिका सुरेखरित्‍या साकारू शकणार नाही. आणि तुम्‍ही मालिकेमधील माझ्या आवडत्‍या पात्र आहात’. दिग्‍गज व्‍यक्‍तीकडून असे कौतुकास्‍पद शब्‍द ऐकून माझा आनंदात गगनात मावेनासा झाला आणि मी पूर्णत: भारावून गेले.

आणखी एका संस्‍मरणीय क्षणाबाबत सांगायचे तर, एका एपिसोडसाठी जॅकी श्रॉफ जी आमच्‍यासोबत शूटिंग करण्‍यासाठी आले होते. आम्‍ही शूटिंग पूर्ण केल्‍यानंतर ते माझ्याकडे आले आणि मला म्‍हणाले की ‘मी त्‍यांना माधुरी दिक्षितप्रमाणे कटिबद्धता, स्‍टाइल व व्‍यावसायिकता अशा अनेक गुणांची आठवण करून दिली’. मी माधुरींची निस्‍सीम चाहती आहे आणि आपल्‍या आवडत्‍या कलाकाराशी तुलना करणे ही मोठी प्रशंसा आहे. आणि ही प्रशंसा चित्रपटसृष्‍टीमधील दिग्गज ‘हिरो’कडून होणे स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे होते. मला खूप आनंद झाला, सोबत भावूक देखील झाले, जे मी शब्‍दांमध्‍ये सांगू शकत नाही.

  • आतापर्यंतचा तुमचा आवडता एपिसोड कोणता आहे?

अनेक प्रेक्षकांना माहित नाही की, सानंद वर्मा साकारत असलेली भूमिका अनोखे लाल सक्‍सेना मालिकेमधील माझे आवडते पात्र आहे. मला त्‍यांची भूमिका अत्‍यंत अद्भुत व अद्वितीय वाटते. त्‍यांची अभिव्‍यक्‍ती अमूल्‍य व अत्‍यंत धमाल आहे. कलाकार म्‍हणून मला ती आव्‍हानात्‍मक भूमिका वाटते आणि प्रेक्षकांना हसवणे सोपे नाही. मला अशा आव्‍हानात्‍मक व मनोरंजनपूर्ण भूमिका साकारायला आवडेल. नशीबाने मला एका एपिसोडमध्‍ये ही भूमिका साकारायला मिळाले. मी एका एपिसोडमध्‍ये लेडी सक्‍सेनाची भूमिका साकारली आणि तिचे नाव ‘सक्‍सेनी’ होते. हा एपिसोड खूप धमाल व विनोदी होता आणि मी सानंद जी यांच्‍यासोबत शूटिंग करताना खूप धमाल केली. आम्‍ही दोघे विलक्षण गोष्‍टी करताना आणि इलेक्ट्रिक शॉक्‍स मिळताना दिसलो होतो, जे अत्‍यंत मनोरंजनपूर्ण हेाते. मला प्रेक्षकांकडून अनेक सकारात्‍मक अभिप्राय देखील मिळाले आणि ते आजही माझे फेवरेट आहे.

  • एक गुण, जो शुभांगी व अंगूरीमध्‍ये समान आहे?

अंगूरीप्रमाणे मी घरी बहुतांश वेळ किचनमध्‍ये व्‍यतित करते आणि इतरांचे खुल्‍या मनाने स्‍वागत करते (हसते).

  • तुम्‍ही तुमचा बहुतांश वेळ सेटवर व्‍यतित करता. शूटिंगव्‍यतिरिक्‍त तुम्‍हाला इतर कोणत्‍या गोष्‍टी करायला आवडतात?

माझे सर्वांसोबत चांगले नाते असले तरी मी आसिफ जी, रोहिताश्‍व जी आणि आमच्‍या दिग्‍दर्शक हर्षदा मॅडम यांच्‍याशी खूप जवळ आहे. मी हर्षदा मॅडमना माझ्या सर्व गोष्‍टी शेअर करते. आम्‍ही एका कुटुंबासारखे आहोत आणि एकत्र लक्षणीय वेळ व्‍यतित करतो. ब्रेकदरम्‍यान आम्‍ही खूप धमाल करतो, विनोद सांगतो आणि मनसोक्‍त हसतो. आम्‍ही तालीमीदरम्‍यान एकमेकांची मस्‍करी देखील करतो. माझ्या मते, सर्वांमध्‍ये असलेल्या उत्तम नात्‍यामुळे वातावरण धमाल व उत्‍साहवर्धक होऊन जाते. मालिका ‘भाबीजी घर पर है’च्‍या सेटवर असताना कधीच कंटाळवाणे वाटत नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: