fbpx

ST ची आरामदायी प्रवासाकडे वाटचाल.. 50 स्लीपर, 450 पुशबॅक बस आणि 200 हिरकणी लवकरच सेवेत

पुणे : खासगी ट्रॅव्हल्स बसला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. महामंडळाने पहिल्यादा 50 साध्या स्लीपर(शयनयान) बस प्रवासी सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय साध्या 450 गाडीत पुशबॅक आसनांची व्यवस्था आणि 200 नविन धाटणीच्या हिरकणी बस लवकरच महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसची बांधणी एसटीच्या पुणे येथील दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत सुरु आहे..
राज्यातील जनतेला येत्या काही महिन्यापासून एसटीमधून आरामदायी प्रवास करता येणार आहे.कोरोना आणि आर्थिक तोटा यामुळे एसटीने ताफ्यात गेल्या काही वर्षापासून नविन बस घेतलेली नाही. त्यामुळे आर्यूमान संपलेल्या, भंगार अवस्थेतील गाड्या सध्या धावत आहेत. अशी टिका सातत्याने एसटीवर होत होती. यामुळे एसटी कडे प्रवासी वळेनासे झाले आहेत. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी ताफ्यात नविन बस सामील करून घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार टाटा मोटर कंपनीकडून 700 चेसिस महामंडळाने घेतल्या आहेत. त्यावर बस बांधण्याचे काम सध्या एसटीच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळेत सुरु आहे.एसटीच्या चिखलठाणा (छत्रपती संभाजी नगर) , हिंगणा ( नागपूर ) आणि दापोडी ( पुणे ) या तीन कार्यशाळा आहेत.

दापोडी कार्यशाळेत 200 हिरकणी आणि साध्या बस बांधण्याचे काम सुरु आहे. आता पर्यंत दापोडी कार्यशाळेतून 154 परिवर्तन बसची बांधणी पूर्ण झाली असून,त्या वेगवेगळ्या डेपोत(आगारात) प्रवासी सेवेत दाखल झाल्या आहेत. 11 मीटरच्या चॅसिसवर लालपरी तर 12 मीटरच्या चॅसिसवर हिरकणी बसची बांधणी होत आहे. दिवसाला 2 ते अडीच बसच्या बांधणीचे काम पूर्ण करण्यात येत आहे.जून महिन्याच्या अखेर पर्यत 200 हिरकणी बसची बांधणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

हिरकणीचे कमबॅक
1982 च्या एशियाड गेम मधील खेळाडूंना ये – जां करण्यासाठी बांधलेल्या बस प्रवाशाच्या पसंतीच्या ठरल्या. परंतु या बसची संख्या हळूहळू कमी होत गेल्याने त्या काळाच्या पडड्या आड जातात की काय? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या एशियाड बसची संख्या वाढविण्यावर महामंडळाने भर दिला आहे. दोन मोठ्या शहरांना जोडणारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना किफायतशीर आरामदायी प्रवास घडवून आणणारी हिरकणी नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होत असुन त्यापैकी पहिली बस पुणे – दादर मार्गावर धावू लागली आहे.

हिरकणीची वैशिष्ट्य
आतील बाजूस थर्मोप्लास्टिक शीट लावली आहे. दरवाजाला स्वयंचलित जॅक, नाईफ पद्धतीने बसविला आहे. त्यामुळे दरवाजा आतील बाजूस सरकत्या पध्दतीने उघडला जाईल. तयार ‘डिसेन्सी फ्रेम’ बसविली आहे. रीडींग लॅम्प आणि चार्जिंग सॉकेटची सुविधा मॅगझीन पाऊच, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी होल्डर तसेच बॅग हुक
आरामदायक सीट

बसची रंगसंगती पॅपिरस पांढरा, पानांचा हिरवा आणि शुध्द भगवा रंग अशा आकर्षक रंगात केली आहे. यापुढे जांभळ्या व पांढऱ्या रंगसंगतीत पूर्वीप्रमाणे हिरकणीसाठी रंगसंगती नियोजित आहे.

50 स्लीपर

एसटीच्या ताफ्यात सध्या साध्या सेटिंग कम स्लीपर बस आहेत. यात खाली सीटिंग आणि वर स्लीपर आहे. परंतु आता नविन येणाऱ्या स्लीपर बस मध्ये सर्व बर्थ स्लीपर असणार आहेत. एकूण 30 बर्थ असणार आहेत.

एसटीचा प्रवास आरामदायी होणार – शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

एसटीचा प्रवास येत्या काळात अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. 2 हजार साध्या(लालपरी) बसची निविदा काढली आहे. या बस या वर्षात येतील. या शिवाय भाडेतत्वावर 500 साध्या(लालपरी) बस घेण्यात आल्या आहेत. त्यातील काही बस लातूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आगाराला दिल्या आहेत. तसेच भाडेतत्ववारिक 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसकरीता निविदा काढली आहे.या बस 101 डेपोना देणार आहे. राज्यात 172 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

सुरक्षित प्रवासावर भर
पूर्वी एसटीची बांधणी अलुमिन्यमची असायची . परंतु एकदा अपघात घडल्यास त्यात जीवितहानी जास्त होत असे. त्यामुळे 2016पासून एसटीने सर्व गाड्या माईल्ड स्टील मध्ये बांधण्याचा निर्णय घेतला.सध्या ताफ्यातील ५० टक्के गाड्या या माईल्ड स्टीलच्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: