fbpx

वुमन हू लीड नॅशनल अवॉर्ड अ‍ॅण्ड कन्सोर्टियम इनिशिएटिव्ह

 पुणे : वुमन हू लीड (डब्ल्यूडब्ल्यूएल) ही संस्था राधिका सुधीर (Radhika Sudhir)यांच्या संकल्पनेतुन साकार आणि स्थापित झाली आहे, २०२० मध्ये पुण्यात सुरू झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूएलची सुरूवात विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून करण्यात आली.
वुमन हू लीड (डब्ल्यूडब्ल्यूएल) ने आजतगायत अणेक वंचित कामगार महिलांसाठी आर्थिक जागरूकता कार्यक्रम सादर करण्यात पुढाकार घेतला आहे, जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल. याचबरोबर त्यांचा सर्वांगीण आणि सामाजिक विकास होईल, आणि त्या आपल्या उज्वल भविष्य योजना बनवण्याविषयी जागरूक होतील. आजच्या काळात वंचित महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करने खूप महत्वाचे आहे , त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्या जागरूकता आणून त्यांच्या भविष्यासाठी कार्य करण्यासाठी वुमन हू लीड (डब्ल्यूडब्ल्यूएल) ने नेहमीच पुढाकार घेतला आहे, जणेकरून त्या स्वतासाठी आणि अनुषंगाणे आपल्या परिवारासाठी देखील चांगले कार्य करण्यास प्रेरित होतील. याविषयी आपले विचार मांडताना राधिका सुधीर म्हणाल्या, “सामान्यत: स्त्रिया, जरी कमावत असल्या तरी त्या कुटुंबातील आर्थिक निर्णय घेणार्‍या नसतात, आपल्याला ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. त्यांच्या महत्वाकांक्षेला प्रोत्साहन देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना प्रेरणा देणे हाच आमचा मुळ उद्येश्य आहेत.” वुमन हू लीड नॅशनल अवॉर्ड अ‍ॅण्ड कन्सोर्टियम यांनी उंड्री (पुणे) येथील काही सहकारी गृहनिर्माण संस्थांसोबत हा उपक्रम सुरू केला आहे आणि आपली ही मोहीम मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे पूर्ण केली आहे, आणि पुढेही आपल्या या दृष्टीकोणाचा विस्तार करण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, महिलांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी ते उत्सुक आहोत. समाजातील महिलांच्या उत्थानासाठी सहकार्य करून एकत्र काम करण्यासाठी ते नेहमीच असा पुढाकर घेतील.
 

Leave a Reply

%d bloggers like this: