fbpx

नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत नुकताच इंद्राणी या नव्या व्यक्तिरेखेने प्रवेश केलेला आहे. ही इंद्राणी कोण आहे, याबद्दल बंटी रूपालीला सांगतो. इंद्राणीला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तिला माणसाच्या मनातलं ओळखू येतं. रूपाली बंटीचं ऐकून इंद्राणीची भेट घ्यायचं ठरवते. आता ही इंद्राणी रूपालीची मदत करणार का, हे आपल्याला झी मराठी वाहिनीवर १९ मार्चला दुपारी २ आणि रात्री ९ वाजता महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

आपला प्रत्येक डाव नेत्राने उधळून लावल्याने हतबल झालेली रूपाली एकटी पडते. तिला भीती वाटू लागते. नेत्राला अव्दैत आणि राजाध्यक्ष कुटुंबापासून दूर करण्याचे रूपालीचे सगळे प्रयत्न फसतात. रूपालीचं कारस्थान एकेक करून घरातल्या सर्वांच्या लक्षात येतं. त्रिनयना देवीच्या मंदिरातील ग्रंथ चोरणं आणि तो वाचून घेणं, इथपर्यंतच्या प्रवासात रूपाली अनेक संकटं स्वतःच्या स्वार्थापायी ओढवून घेते. परंतु ती हार मानत नाही.

अव्दैत ही घरातील एकमेव व्यक्ती आता रूपाली सोबत आहे. अव्दैतला कधीही संशय येऊ नये, याची खबरदारी घेत रूपाली सध्या सावधपणे नेत्राविरोधात नवी खेळी खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे. यामध्ये इंद्राणी तिची साथ देणार का, इंद्राणीने तिची साथ दिलीच तरी यामध्ये इंद्राणीचा कुठला वेगळा हेतू असणार का, नेत्रा इंद्राणीच्या स्वरुपात येणाऱ्या नव्या वादळाचा सामना कसा करणार हे आता आपल्याला सातव्या मुलीची सातवी या मालिकेत पहायला मिळणार आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: