fbpx

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण


नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली.

आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच आग्रही असतात. त्याचीच प्रचिती कालही दिल्लीमध्ये आली. अल्पोपहाराच्या निमित्ताने देशाच्या राष्ट्रापतींना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्याशी चर्चा करताना खासदार सुळे यांनी दौंड आणि इंदापूर तालुक्यांचा विशेष उल्लेख केला. दौंड येथील रेल्वे जंक्शन तसेच भिगवण येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारे परदेशी फ्लेमिंगो पक्षी हे इंदापूरचे खास वैशिष्ट्य आहे. या दोन्ही तालुक्यांना भेट देण्यासाठी राष्ट्रपतींनी जरूर यावे, अशी विनंती त्यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: