ऑटोमोटिव्ह ग्राहकांसाठीच्या प्रदर्शन आणि गुणवत्ता प्रणालीविषयी मार्गदर्शन सत्राला प्रतिसाद
पुणे : आंतररराष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून १५ मार्च रोजी ‘मकास ऑटोमोटिव्ह’ ने पुण्यात रेसिडेन्सी क्लब येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. ग्राहक,मेकॅनिक,रिटेलर यांना कंपनीचे नवे तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख धोरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. गुणवत्ता प्रणालीविषयी मार्गदर्शन सत्र देखील उत्साहात पार पडले. सकाळी ११ वाजता मेकॅनिक मेळावा आणि सायंकाळी ७ वाजता रिटेलर,ग्राहक मेळावा पार पडला.
‘मकास ऑटोमोटिव्ह’ चे व्यवस्थापकीय संचालक अनुज मेहता,सरव्यवस्थापक प्रमोद कुमार, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चे मुख्य अभियंता रमेश चव्हाण,विभागीय व्यवस्थापक एस.एन.यादव,मार्केटिंग मॅनेजर असिफ खान,विभागीय व्यवस्थापक प्रदीप मौर्य,अभिजित ऑटो कंपोनंटस प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र कुमार सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार सिंग,विकास अधिकारी संतोष कुमार सिंग,गोयल एजन्सी(पुणे) चे प्रमुख सुनील गोयल, मयूर राणे, एस.एन. यादव, सुनील नायर उपस्थित होते. पुण्याच्या अवजड वाहन उद्योगांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
बनावट ब्रेक,क्लचमुळे वाढते अपघाताची शक्यता:प्रमोद कुमार
सकाळी ११ वाजता झालेल्या मेकॅनिक मेळाव्यात प्रमोद कुमार यांनी मार्गदर्शन केले.
‘मकास ऑटोमोटिव्ह कंपनी ही सुरूवाती पासूनच उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीने तयार केलेले क्लच प्लेट, ब्रेक आणि ब्रेक लायनर व त्याला लागणार्या सर्व फिटिंग्ज या अतिशय दर्जेदार आणि दीर्घकालीन चालणाऱ्या, दीर्घायुषी अशी उत्पादने आहेत, हे ब्रेक लायनर घासून घासून गुळगुळीत होणार नाही, झिजणार नाही, यांची पूर्ण गॅरंटी आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता अजिबात नाही. पण ग्राहक,मेकॅनिक यांनी बनावट,डुप्लिकेट उत्पादने- ब्रेक, लायनर, क्लचप्लेट बसवून न फसता मकास कंपनीचे उत्कृष्ट दर्जाचेच क्लच आणि ब्रेक बसवावे! जेणेकरून अपघात होणार नाहीत ‘, असे आवाहन मकास ऑटोमोटिव्ह कंपनीचे जनरल मॅनेजर प्रमोद कुमार यांनी केले.
यावेळी सुनील गोयल, मौर्य, जितेंद्र कुमार सिंग, एस. एन. यादव, असिफ खान आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र कुमार सिंग, यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण कुमार सिंग यांनी केले