fbpx

भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ?

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होतांना दिसत आहेत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाशिकमधून निघालेल्या किसान सभेचा मोर्चा विधानभवनावर लवकरच धडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते प्रवीण अलई (Praveen Alai) यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. 

नाशिकमधून काल असंख्य शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. त्यांचा हा मोर्चा विधानभवनावर लवकरच धडकणार आहे. यावर बोलतांना अलई म्हणाले की, जनतेला विचलित करणारी स्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची सरकारे होती. त्यावेळी सर्व काही अलबेल व समृद्ध होते का? शेतमालाला अतिरिक्त भाव होता का? असा सवालही त्यांनी केला आहे. 

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की,  शेतकरी राजा कर्ज मुक्त झाला होता ? पाण्याचे प्रश्न संपुष्टात आले होते का? असा सवाल करीत नाही तर..मग भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ? असा सवाल करीत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: