यंदा होळीला तुमचे केस व त्वचेची काळजी घेण्यासाठी उपाय!
रंगांचा सण होळी जवळच आला आहे. आपण एकमेकांवर रंगांची उधळण करण्याचा आनंद घेत असताना त्यामुळे आपली त्वचा व केसांच्या होणाऱ्या नुकसानाचा देखील विचार करतो. एण्ड टीव्ही कलाकार होळीदरम्यान त्यांची त्वचा व केस स्वस्थ ठेवण्यासाठी करणाऱ्या नैसर्गिक उपायांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका ‘दूसरी मॉं’मधील प्रीती सहाय (कामिनी), मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील कामना पाठक (राजेश सिंग), मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी). एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये कामिनीची भूमिका साकारणाऱ्या प्रीती सहाय म्हणाल्या, ‘‘होळी माझा आवडता सण आहे. मला रंगांची उधळण करायला आवडते. पण अनेक सुरक्षित व नैसर्गिक रंग असले तरी आपले केस व त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मुलभूत नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मी त्यांचे घातक रंगांपासून संरक्षण करण्यासाठी माझ्या आईचा साधा, पण गुणकारी उपाय अवलंबते. प्रत्येक घरामध्ये सामान्यत: खोबरेल तेल व ऑलिव्ह तेल असते आणि ते तुमचे केस व त्वचेचे कोणतेही नुकसान न करता प्रभावी ठरते. खोबरेल तेल त्वचा व केसांवर थर म्हणून कार्य करते, ज्यामुळे रंगांमधील रसायनांमुळे त्यांचे कोणतेही नुकसान होत नाही. मी होळी खेळायला बाहेर जाण्यापूर्वी माझा चेहरा, हाता-पायांना खोबरेल तेल लावते. तसेच माझ्या केसांच्या संरक्षणासाठी होळीच्या आदल्या रात्री केसांना खोबरेल तेल लावते. म्हणून मी सर्व प्रेक्षकांना एक अद्वितीय उपाय म्हणून खोबरेल तेल वापरण्याची शिफारस करते. कृपया या उपायाचा वापर करत तुमचे केस व त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करा आणि होळी खेळण्याचा आनंद घ्या.’’
राजेश सिंगची भूमिका साकारणाऱ्या कामना पाठक म्हणाल्या, ‘‘रंगांच्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी अनेक कारणे आहेत, जसे एकमेकांवर गुलाल उधळणे, गुजिया व थंडाईचा आस्वाद घेणे. पण रंगांचा त्वचा व केसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. सणापूर्वी व सणानंतर योग्य स्किन उपायांसह त्वचेची काळजी घेतली नाही तर घातक रसायने असलेले रंग, अधिक वेळ सूर्यप्रकाशात राहणे व उष्णतेमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. माझी त्वचा संवदेनशील आहे आणि मला रंगांची अॅलर्जी आहे. म्हणून मी नेहमी नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी खेळण्याचा आनंद घेते. मी त्वचा कोरडी होण्याला प्रतिबंध करण्यासाठी माझी त्वचा मॉइश्चराइज करते. होळी साजरीकरणानंतर माझा मुलभूत स्किनकेअर मंत्र म्हणजे दही, मध व काहीशी हळद यांचे मिश्रण, जे मी होळी सण संपल्यानंतर काही दिवस दररोज माझा चेहरा, मान व हातांना लावते आणि २० मिनिटांनंतर धुते. यामुळे माझी त्वचा तेजस्वी होण्यासोबत कोमल व आकर्षक होते. तसेच, मी टाळू, केसांची मुळे व केसांच्या टोकांना ऑलिव्ह ऑइलने मसाज करते आणि रंग काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करते.’’ अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या विदिशा श्रीवास्तव म्हणाल्या, ‘‘होळी खेळायला जाण्यापूर्वी मी माझी त्वचा मॉइश्चराइज करायला कधीच विसरत नाही. माझ्या त्वचेचे सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी मी मोठ्या प्रमाणात बदाम तेलाचा वापर करते. मी हे तेल माझे हात, पाय, मानेला लावते. होळी खेळून झाल्यानंतर मी दोन चमचे मीठ, एक चमचा लिंबाचा रस आणि काही थेंब ऑलिव्ह तेल यांचे मिश्रण असलेल्या फेस स्क्रबचा वापर करते. या उपायामुळे मला त्वचेमधील अतिरिक्त मळ व तेल दूर करण्यास मदत होते. अधिक वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्यावर उपाय म्हणून ताक देखील वापरता येऊ शकते. यामुळे त्वचेची जळजळ कमी होऊन शरीराला हलके वाटेल, कारण दह्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत. ओठ व मानेकडे देखील लक्ष द्या. हा उपाय जादुई आहे.’’
पहा ‘दूसरी मॉं’ रात्री ८ वाजता, ‘हप्पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!