fbpx
Monday, September 25, 2023
ENTERTAINMENTLatest News

होळीच्‍या रंगांसह स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थांचा आस्‍वाद!

होळी हा रंगांचा सण वैविध्‍यपूर्ण व आकर्षक असून उत्‍साह व जल्‍लोषाचे प्रतीक आहे. लोक एकमेकांना रंग लावतात आणि स्‍वादिष्‍ट मिष्‍टान्‍न व पेयांचा (भांग) आस्‍वाद घेतात. यंदा एण्‍ड टीव्‍ही कलाकार जल्‍लोषात होळी सण साजरा करण्‍यासोबत त्‍यांच्‍या मूळगावामध्‍ये लोकप्रिय असलेली होळीला बनवली जाणारी मिष्‍टान्‍ने बनवणार आहेत. आणखी उत्‍साहाची बाब म्‍हणजे ते आपल्‍याला या सिक्रेट पाककृतींबाबत देखील सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका ‘दूसरी मॉं‘मधील नेहा जोशी (यशोदा), मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन‘मधील योगेश त्रिपाठी (दरोगा हप्‍पू सिंग), मालिका ‘भाबीजी घर पर है‘मधील शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी).

मालिका ‘दूसरी मॉं‘मध्‍ये यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्‍या, ‘‘मी महाराष्‍ट्रामधून असले तरी यंदा मी गुलाबी शहर जयपूरमध्‍ये होळी साजरी करणार आहे. मला रंगांची उधळण करायला आवडत नसले तरी मी उत्‍सवामधील उत्‍साहाचा आनंद घेते. म्‍हणून मी शहरामध्‍ये फेरफटका मारत येथील एलिफंट फेस्टिवलमधील उत्‍सवी उत्‍साहाचा आनंद घेणार आहे. हा फेस्टिवल होळीदरम्‍यान साजरा केला जातो, जेथे हत्तींना गालिचे घालण्‍यासोबत सुंदर आभूषणांसह सजवले जाते. त्‍यांचे शरीर व सोंड रंगवले जातात आणि रस्‍त्‍यांवरून हत्तींची मिरवणूक काढली जाते. उत्‍सवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍याकरिता बॅण्‍ड गाणी सादर करण्‍यासोबत ड्रम वाजवतात. मी या अनोख्‍या फेस्टिवलमध्‍ये सहभागी होण्‍यास उत्‍सुक असले तरी मला माझी आई बनवणाऱ्या पुरणपोळीची खूप आठवण येईल. महाराष्‍ट्रात होळीच्‍या दिवशी पुरणपोळी बनवण्‍याची परंपरा आहे. ही गोड, तव्‍यावर भाजली जाणारी चपाती आहे, ज्‍यामध्‍ये चण्‍याची डाळ व गुळाचे मिश्रण असलेले पुरण भरलेले असते. हा सण कापणी उत्‍सव म्‍हणून देखील ओळखला जातो. मला पुरणपोळी इतकी आवडते की, ती मी दिवसभर खात राहिन (हसते). मी यंदा स्‍वत: पुरणपोळी बनवून येथे माझ्या दुसऱ्या कुटुंबाला खाऊ घालणार आहे. 

योगेश त्रिपाठी म्‍हणाले, ‘‘हा वर्षातील माझा आवडता सण आहे. मी उत्तरप्रदेशचा आहे, जेथे होळी सण उत्‍साहात व जल्‍लोषात दोन दिवस साजरा केला जातो. एकमेकांवर रंगांची उधळण व पाण्‍याचा वर्षाव करण्‍याव्‍यतिरिक्‍त मला या दिवशी गुजिया (गोड पदार्थ) खायला खूप आवडते. खवा व नट्सने भरलेल्‍या कुरकुरीत, फ्लॅकी पेस्‍ट्रीसह बनवलेला हा क्‍लासिक उत्तर भारतीय गोड पदार्थ आहे. यंदा मी स्‍वत: गुजिया बनवणार आहे. मी आमच्‍या इमारतीमध्‍ये माझी पत्‍नी व मुलांसह रंगपंचमी देखील खेळणार आहे. होळीदरम्‍यान आमच्‍या सोसायटीचे स्विमिंग पूल रंगीत पाण्‍याने भरले जाते. माझा मुलगा यासाठी खूपच उत्‍सुक असल्‍यामुळे मी त्‍याच्‍यासोबत अधिकाधिक वेळ पूलमध्‍ये व्‍यतित करणार आहे. 

शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ‘‘मी दरवर्षी होळी सण साजरा करताना माझ्या मित्रमैत्रिणींसाठी अनेक गोड पदार्थ व स्‍नॅक्‍स तयार करते आणि यंदा देखील यामध्‍ये काहीच बदल नसणार आहे. मी माझे मूळगाव भोपाळमधील काही स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थ बनवणार आहे. मी गुजिया, जिलेबी, बेसनाचे लाडू, चकली व भाकरवडी बनवणार आहे. तसेच माझ्या मुलीने सणाचा आनंद घेण्‍याकरिता आमच्‍या अतिथींसाठी काही उत्‍साहवर्धक गेम्‍सची योजना आखली आहे आणि मी त्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे. अद्भुत व सुरक्षित होळी खेळण्‍याचा आनंद घ्‍या.“

Leave a Reply

%d bloggers like this: