fbpx

यशोदा व कृष्‍णा अशोकच्‍या शोधात पोहोचले हरिद्वार – ऋषिकेशला

एण्‍ड टीव्‍हीवरील कौटुंबिक मालिका ‘दूसरी मॉं’ कथानकामधील रोमांचक ट्विस्‍ट्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेमध्‍ये अशोक (मोहित डागा) त्‍याची पत्‍नी यशोदाला (नेहा जोशी) त्‍याचे गुपित समजल्‍यानंतर गायब होतो. ते गुपित म्‍हणजे कृष्‍णा (आयुध भानुशाली) हा त्‍याचा व मालाचा (निधी उत्तम) मुलगा आहे. सर्वजण अशोकचा शोध घेत असताना यशोदा व कृष्‍णा देखील त्‍याचा शोध घेण्‍याच्‍या प्रवासावर जातात. हा प्रवास त्‍यांना उत्तराखंडमधील हरिद्वार व ऋषिकेश या पवित्र नगरांच्या गल्ल्या आणि घाटांमधून घेऊन जातो. त्यांना समजते की तो येथे शेवटचा दिसला होता, आणि दुःखी होत त्याने एक संन्यासी बनण्याचा व पश्चात्ताप करण्यासाठी सर्वकाही त्‍याग करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्‍हणाल्‍या, ‘‘कृष्‍णा आपल्‍या पतीचा अवैध मुलगा असल्‍याचे समजल्‍यानंर यशोदा तिच्‍या जीवनातील सर्वात खडतर काळाचा सामना करत आहे. तिला हे सत्‍य स्‍वीकारणे अवजड जाते आणि तिचा सर्वात मोठा पाठीराखा असलेला अशोक गायब होतो. प्रेक्षकांना यशोदा कृष्‍णासोबत त्‍याचा शोध घेण्‍याच्‍या प्रवासावर जाताना पाहायला मिळेल. हा प्रवास पडद्यावर भावनिक दिसेल, पण मी पडद्यामागे शूटिंग करताना खूप धमाल केली. हरिद्वार व ऋषिकेश यांसारख्‍या पवित्र शहरांमध्‍ये शूटिंग करणे धन्‍य होते. सकाळी लवकर उठल्‍यानंतर आम्‍हाला गंगा घाटच्‍या नदीकाळी वाजणारे घंटानाद ऐकायला मिळाले. दिवसाची सुरूवात अशा सुंदर वातावरणासह झाल्‍याने निश्चितच सकारात्‍मक वाटायचे. आमच्‍या अवतीभोवती असलेल्‍या लोकांनी आम्‍हाला त्‍वरित ओळखले आणि त्‍यांनी आमच्‍यासोबत सेल्‍फी काढण्‍यासोबत आमची मालिका व पात्रांची प्रशंसा देखील केली. आमच्‍या सेटभोवती जमा होऊन शूटिंग पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांसोबतच्‍या परस्‍परसंवादांनी आमचा दिवस सार्थ ठरवला, तसेच त्‍यांनी आमच्‍यासाठी घरी बनवलेले खाद्यपदार्थ देखील आणले. हा लहान गेस्‍चर आमच्‍यासाठी मोठा परिवर्तनशील ठरला. आम्‍ही या सुरेख क्षणांचा मनमुराद आनंद घेतला. मी उत्तराखंडला पहिल्‍यांदाच भेट दिली असली तरी मला सांगावेसे वाटते की, येथील लोकांचा स्‍वागतार्हपणा व आपुलकीने माझ्या मनात खास भावना निर्माण केली आणि आम्‍ही पुन्‍हा येथे येण्‍याची आशा करतो.’’ आयुध भानुशाली ऊर्फ कृष्‍णा म्‍हणाला, ‘‘यशोदा मॉं आणि मी माझे वडिल अशोक यांना घरी परत आणण्‍यासाठी उत्तराखंडमध्‍ये आलो. आम्‍ही सुंदर शहरामध्‍ये या लक्षणीय एपिसोडच्‍या शूटिंगच्‍या वेळी खूप धमाल केली. आम्‍ही आमच्‍या मर्यादित वास्‍तव्‍यादरम्‍यान शहरामध्‍ये फेरफटका मारला. आम्ही हर की पौरी, राम झुला आणि लक्ष्मण झुला यांसारख्या लोकप्रिय ठिकाणी शूटिंग केले. मी फक्त या ठिकाणांबद्दल ऐकले होते, पण तिथे कधीच गेलो नव्‍हतो. भेटीदरम्यान, नेहा आई व मी रस्त्यावर फिरण्याचा आनंद घेण्‍यासोबत आलू पुरी, समोसा, चाट व मलाई लस्सी यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्‍वाद घेतला. तसेच, आम्‍ही हरिद्वारमध्‍ये शॉपिंगचे ठरवले नव्‍हते. आम्‍ही आमच्‍या कुटुंबियांसाठी दगडामध्‍ये कोरलेले लहान शिवलिंग (भगवान शिवचे रूप) खरेदी करण्‍यापासून स्‍वत:ला रोखू शकलो नाही. तसेच गंगा आरती करताना मला खूप आनंद झाला.’’
मोहित डागा ऊर्फ अशोक म्‍हणाले, ‘‘हरिद्वार व ऋषिकेश ही माझी दोन आवडती पर्यटन स्‍थळे आहेत. हे ठिकाण अत्‍यंत उल्‍लेखनीय होते. बाहेर शूटिंग करणे नेहमीच उत्‍साहवर्धक व आव्‍हानात्‍मक असते, कारण मर्यादित वेळेमध्‍ये शूटिंग पूर्ण करायची गरज असते. एपिसोडमध्‍ये रोमांचक वळण आहे, जेथे अशोक परिस्थितीला सामोरे जाण्याच्या भीतीने बेपत्ता होतो. दिवसा शूटिंग संपल्‍यानंतर मी जवळच्‍या ठिकाणी फेरफटका मारायला जायचो. प्रसिद्ध हरी की पौरी पाहणे आणि मंदिरामध्‍ये दर्शन घेणे या पवित्र शहरामध्‍ये आल्‍यानंतर माझ्या प्राधान्‍य यादीमध्‍ये होते. मी या स्‍थळाचे सौंदर्य पाहताच भारावून गेलो. मी पहिल्‍यांदाच सीक्‍वेन्‍सचे शूटिंग केले, ज्‍यामध्‍ये मी पवित्र गंगा नदीमध्‍ये पूजा केली. त्‍या दिवशी पाणी खूप थंड असताना देखील मी सुलभपणे सीक्‍वेन्‍सचे शूटिंग केले. संपूर्ण शूटिंग अनुभव संस्‍मरणीय होता आणि आम्‍ही हरिद्वार व ऋषिकेश शहरांमध्‍ये अनेक आनंदी आठवणी निर्माण केल्‍या. आमच्‍या मालिकेमध्‍ये रोचक कथानक पाहायला मिळणार आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक त्‍यामागील उलगडा जाणून घेण्‍यासाठी निश्चितच टेलिव्हिजन स्क्रिनसमोर‌ खिळून राहतील.’’

Leave a Reply

%d bloggers like this: