fbpx

सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन देवदर्शन घेतलं, विजय शिवतारेंचा गंभीरआरोप

पुणे: शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मंतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.  या पोस्टमध्ये विजय शिवतारे यांनी म्हंटले आहे की, सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. विजय शिवतारे यांच्या फेसबुक पोस्टमुळे मटण खाऊन दर्शन घेतल्याने सुप्रिया सुळे यांच्यावर काहीजण टीका करत आहेत. या प्रकरणाचे काय राजकीय पडसाद उमटतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. . 

https://www.facebook.com/plugins/post.php?(href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FShivtareVijay%2Fposts%2Fpfbid02bwcX6uWQ3v44ZceSrphzpNSYxpS7PXFFx4SeUwW3ZkisdX8sqqCJ6qwvcw62YkX2l&show_text=true&width=500”

विजय शिवातरे यांनी व्हिडिओ शेअर करताना सुप्रिया सुळे यांचे देवदर्शन घेतानाच फोटो देखील शेअर केले आहे. शिवतारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला , अशी खोचक टीका शिवतारे यांनी केली आहे. विजय शिवतारे यांनी हा व्हिडिओ शेअर केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: