fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

मनोज तिवारी यांनी केला राधे माँचा वाढदिवस अधिक भक्तिमय 

‘श्री राधे माँ चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे प्रदीर्घ काळापासून चालत आलेली वार्षिक परंपरा पाळत ट्रस्टने राधे माँचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. जेथे तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पीडितांच्या गरजेनुसार मोफत चाचण्या, औषधे, चष्मे इत्यादी पुरविण्यात आले होते आणि शस्त्रक्रिया देखील प्रायोजित करण्यात आल्या होत्या. आणि ‘मोफत धान्य आणि पंखे वाटप’ या कार्यक्रमात या कार्यक्रमासाठी नोंदणी केलेल्या हजारो लोकांना धान्याने भरलेली पोती दान करण्यात आली.

राधे माँच्या वाढदिवसानिमित्त, बोरिवली येथील त्यांच्या भवनात पवित्र श्री सुखमणी साहिबजींचे पठण करण्यात आले. मातेच्या जागरन आणि भजन संध्याने समारोप झालेल्या दिवसभराच्या कार्यक्रमात राधेगुरु माँ सहभागी झाल्या. संजीव कोहली आणि त्यांच्या टीमने यात संगीतमय सादरीकरण केले.हिमाचल प्रदेशातील माँ चिंतापूर्णी (छिन्नमस्तिका) मंदिराचे मुख्य पुजारी पंडित शिंदे यांनी तेथून स्वत: एक जोट मुंबईत आणला होता. ईशान्य दिल्लीचे भाजप खासदार, सुपरस्टार अभिनेता आणि सुप्रसिद्ध गायक मनोज तिवारी, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आणि होशियारपूर (पंजाब) मतदारसंघाचे खासदार विजय सांपला आणि सेवादार रुपिंदर कश्यप या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान विशेष दिव्यांग लोकांना पाहून राधे गुरु माँ भावूक झाल्या. राधे गुरु माँ यांनी ‘तुम्ही जगाची सेवा करा, परमेश्वराची सेवा करा ‘हे धर्माचे सार समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी राधे माँने सर्वांना दर्शन दिले. संपूर्ण भारतातून आणि जगभरातून त्यांचे भक्त या कार्यक्रमासाठी जमले होते, त्यानंतर सामुदायिक भोजन (भंडारा) सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सेवेदार नंदी बाबा व सेवेदार संजीव गुप्ता यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading