मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ मार्चपासून
‘मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (Meghalaya International Film Festival) चे १४ ते १८ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. मेघालय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कमांडर शांगप्लियांग, डॉ. हरजीत सिंह आनंद (इंडो युरोपियन बिझनेस कौन्सिल चेम्बर ऑफ कॉमर्सचे संस्थापक), आयपीएस अधिकारी मोहन राठोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात महोत्सवाचा लोगो आणि अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी पंकज बेरी, मानव सोहल, श्रावणी गोस्वामी, ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेडचे योगेश लखानी, अर्चना जैन, एकता जैन, शिवम मिश्रा, सेलेब्रिटी ॲस्ट्रॉलॉजर नरेंद्र शास्त्री उपस्थित होते. कमांडर शांगप्लियांग यांनी यावेळी मेघालय चित्रपट धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘मेघालय अतिशय निसर्गसुंदर, शांतपूर्ण आणि अनेक रमणीय स्थळे असलेला प्रदेश आहे. कोलकत्ता, दिल्लीवरून शिलॉंगसाठी थेट फ्लाईटही आहेत. इथले चित्रपटकर्मी तिथे चित्रीकरणासाठी आले तर त्यांना मेघालय सरकारकडून सहकार्य मिळेल’, अशी माहिती त्यांनी दिली. मेघालयमध्ये पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६५ हून अधिक चित्रपट आणि लघुपटही दाखवण्यात येणार आहेत. एबीके मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक संचालिका अरुणा चक्रवर्ती यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.