भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज मध्ये महिला दिन साजरा
पुणे :भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज (Bharti University New Law College )मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन (Women’s Day) साजरा करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा,भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विवेक सावजी,भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ उज्वला बेंडाळे यांच्या हस्ते ‘द सक्सेशन ऍक्ट ‘ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.डॉ उज्वला बेंडाळे ,डॉ ज्योती धर्म लिखित हे पुस्तक डॉ अमन मुल्ला (दिल्ली लॉ हाऊस ) यांनी प्रकाशित केले आहे.
डॉ सलील शृंगारपुरे आणि लीगल एड विभागाच्या स्वयंसेवकांनी तयार केलेल्या महिलांसाठीच्या कायद्यांविषयीची पुस्तिका देखील प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ अमन मिश्रा यांनी केले. डॉ उज्वला बेंडाळे यांनी स्वागत केले.राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महिला हक्कांविषयी मार्गदर्शन केले.कुलगुरू डॉ विवेक सावजी यांनीही मनोगत व्यक्त केले.