सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यवस्था व्यवस्थापन परिषदेसारख्या अतिउच्च अधिकार मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. यासाठी विद्यापीठ विकास मंचने पुढाकार घेतला होता. सर्व नवनियुक्त व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे विद्यापीठ मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी अभिनंदन केले आहे.
व्यवस्थापन परिषदेवरील सदस्य पुढील प्रमाणे
डॉक्टर राजेंद्र विखे पाटील (व्यवस्थापन गट)
प्राचार्य नितीन घोरपडे (प्राचार्य खुला गट)
डॉक्टर देविदास वायदंडे (एससी राखीव गट)
डॉक्टर धोंडीराम पवार (प्राध्यापक खुला गट)
डॉक्टर संदीप पालवे (एनटी गट)
बागेश्री मंथाळकर (पदवीधर खुला गट)
सागर वैद्य (इतर मागासवर्गीय गट)
