रास करंडक : एसकॉन प्रोजेक्टस्, मिलेनियम इंजिनिअर्स, सुर्या ग्रुप, एसजे कन्स्ट्रक्शन्स् संघांची विजयी सलामी !!
पुणे : रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे आयोजित ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एसकॉन प्रोजेक्टस्, मिलेनियम इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टस्, सुर्या ग्रुप आणि एसजे कन्स्ट्रक्शन्स् संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेचा उद्धघाटनाचा दिवस गाजवला.
स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी, पुनावळे येथे सुरू असलेल्या स्पर्धेत विजय मालशेट्टी याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एसकॉन प्रोजेक्टस् संघाने रोहन बिल्डर्स संघाचा ४ गडी राखून सहज पराभव केला. तन्मोयी कांजिलाल याच्या नाबाद ७० धावांच्या जोरावर मिलेनियम इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टस् संघाने आरकॉन पुणे संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
शुभम महाले याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सुर्या ग्रुप संघाने सुरोज बिल्डकॉन संघाचा ३६ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सुर्या ग्रुपने १०२ धावा धावफलकावर लावल्या. याला उत्तर देताना सुरोज बिल्डकॉन संघाचा डाव ६६ धावांवर मर्यादित राहीला. शुभम महाले याने ९ धावात ५ गडी बाद केलेे. करण जाधव याच्या अचूक गोलंदाजीमुळे एसजे कन्स्ट्रक्शन्स् संघाने न्याती इंजिनिअर्स संघाचा ८ गडी राखून सहज पराभव करून विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उद्धघाटन न्याती ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. जगदीश होटे आणि एसकॉन प्रॉजेक्टस्चे कार्यकारी संचालक निलेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस्चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे यांनी सर्वांचे स्वागत केले.
सुरोज बिल्डकॉन प्रा.लि., एसकॉन प्रोजेक्टस्, एसजे कॉन्ट्रॅक्टस्, जीएस पेब अँड सिव्हिल वर्कस्, मिलेनियम इंजिनिरर्स अँड काँट्रॅक्टस लि., न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंटस प्रा.लि., रोहन बिल्डर्स इंडिया, आरकॉन पुणे या ८ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
रोहन बिल्डर्सः १० षटकात ६ गडी बाद ४१ धावा (आदित्य बेलोसे १३, विजय मालशेट्टी ३-९, गितेश शिर्के १-२) पराभूत वि. एसकॉन प्रोजेक्टस्ः ७.५ षटकात ६ गडी बाद ४२ धावा (इंद्रजीत बोडके १६, शशांक मोरे १०, स्वप्निल खराडे २-६); सामनावीरः विजय मालशेट्टी;
आरकॉन पुणेः १० षटकात ५ गडी बाद ११९ धावा (मयुर गोखले नाबाद ४३, रविंद्र तलवार ३६, ओंकार कोठाळकर ११, तन्मोयी कांजिलाल १-११) पराभूत वि. मिलेनियम इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टस्ः ९.३ षटकात २ गडी बाद ११९ धावा (तन्मोयी कांजिलाल नाबाद ७० (२९, ११ चौकार, २ षटकार), उत्तम गुंडपिकर नाबाद १५); सामनावीरः तन्मोयी कांजिलाल;
सुर्या ग्रुपः १० षटकात ५ गडी बाद १०२ धावा (राजेश पवार ५९ (३५, ६ चौकार, २ षटकार), शुभम महाले २३, प्रशांत भोईर १०, रजनिकांत पडवळ ३-२९) वि.वि. सुरोज बिल्डकॉनः १० षटकात ९ गडी बाद ६६ धावा (रजनिकांत पडवळ १६, शुभम महाले ९-५, प्रशांत भोईर १-९); सामनावीरः शुभम महाले;
न्याती इंजिनिअर्सः ९.२ षटकात १० गडी बाद ६० धावा (नितेश बिनावट २६, तरबेज शेख नाबाद १३, करण जाधव ३-१३, अक्षय झगडे २-७) पराभूत वि. एसजे कन्स्ट्रक्शन्स्ः ७.३ षटकात २ गडी बाद ६१ धावा (सिद्धेश वारूळे ३३, श्रीकांत पवार १८, अरविंद कुमार १-८); सामनावीरः करण जाधव;
