दोन दिवसीय हॅण्डलूम साड्यांचे प्रदर्शन
पुणे : हॅण्डलूम लेगसी ब्रँड कंकटाला साड्यांचे प्रदर्शन व विक्री ही २७ ते २८ फेब्रुवारी २०२३ रोजी हॉटेल वेस्टिन, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची वेळ ही सकाळी १० ते रात्री ८ आहे. या प्रदर्शनात पाच हजार ते तीन लाखांपर्यंत किंमतीच्या साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.या साड्यांच्या प्रदर्शनात खास पुण्यातील साडीप्रेमींसाठी भारतातील विणकामाच्या ५० प्रसिद्ध जागांमधून कांचीपुरम मार्व्हल्स सोबत बनारसी, पैठणी, पाटण पटोला, गडवाल, कोटा आणि याशिवाय बऱ्याचं अश्या साड्या ज्या हँडलूमच्या आहेत त्यांची निवड करण्यात आली आहे. ( exhibition of handloom sarees)
या प्रदर्शनाबद्दल श्री मल्लिकार्जुन राव, कंकटाला, व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की,प्रत्येक हंगामात आम्ही भारतातील विविध शहरांमध्ये विशेष अश्या प्रदर्शने आयोजित करतो. या सणासुदीच्या मोसमात, आम्ही आमच्या पुण्यातील ग्राहकांसाठी काही उत्तम हातमागाच्या साड्या निवडल्या आहेत. आम्हाला आशा आहे कि या दोन दिवसीय प्रदर्शनातील हातमागाच्या साड्या या पुण्याच्या साडी पारखी लोकांच्या पसंतीला पडतील.
