लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र ची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
पुणे : लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र हे गेल्या अडीज वर्षांपासून संविधानाच्या संदर्भात प्रचार, प्रसार, प्रशिक्षण, संवादकांची चळवळ उभी करण्याचं महत्वाचं काम करत आहे. सोप्या भाषेत संविधान समजावून सांगणे ही या प्रशिक्षण केंद्राची खासियत आहे. पुणे जिल्ह्यात सुद्धा या दोन वर्षांपासून सक्रिय काम सुरू आहे. शनिवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे झालेल्या सभेत 2023 ते 2025 सालाची पुणे जिल्ह्याची कार्यकारिणी एकमताने ठरवण्यात आली.
या नूतन कार्यकारणीत अध्यक्षपदी गीताली वि. मं. तर उपाध्यक्षपदी उपेंद्र टण्णू यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी मिलिंद जावळे यांची तर सचिव म्हणून शितल यशोधरा यांची निवड करण्यात आली. संघटना बांधणीसाठी वेगवेगळे विभाग बनविण्यात आले आहेत. त्यामध्ये युवा संवाद कार्यवाह- सागर ससाने, योगेश हुपरीकर, अनिता आवळे, महिला संवाद कार्यवाह- सुरेखा गाडे, शैलजा चौधरी, विद्यार्थी व शिक्षक संवाद कार्यवाह- जमीर कांबळे, ज्योत्स्ना भोसले, प्रशासकीय संवाद कार्यवाह – सतीश घावटेमर्दान, सौरभ बगाडे, माध्यम संवाद कार्यवाह- रितेश साळवे, सांस्कृतिक संवाद कार्यवाह- ह्रदयमानव अशोक आणि निधी संकलन विभाग कार्यवाह पदी शर्मिला यशोधरा यांची निवड करण्यात आली आहे.
प्रशिक्षण केंद्राचे राज्य अध्यक्ष सुभाष वारे, कार्याध्यक्ष सुनील स्वामी आणि सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
