Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंचा क्रिकेट संघ जाहीर

पुणे : १ मार्च रोजी पश्चिम विभागीय आंतरराज्यीय स्पर्धा पार पडणार असून सदर स्पर्धेसाठी, महाराष्ट्र राज्य निवड चाचणी शिबिरातून १६ खेळाडूंचा संघ निवड करण्यात आलेला आहे. पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धा ही पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे पार पडेल. या स्पर्धेत महाराष्ट्र, मुंबई, गुजरात, सौराष्ट्र, बडोदा, प्रेसिडेंट इलेव्हन असे ६ संघ सहभागी होणार असून ३ दिवस ही स्पर्धा चालणार आहे. सकाळी ९ वाजता या स्पर्धेचे उदघाटन माजी भारतीय खेळाडू करसन घावरी, ए.आय.सी.ए.पी. सी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे व अनिल जोगळेकर यांच्या उपस्थितीत पार पडेल. अशी माहिती दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा सचिव श्री.राजू मुजावर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग खेळाडूंचा क्रिकेट संघ खालील प्रमाणे. १)कुणाल फणसे (कर्णधार) २) सोमनाथ नलावडे यष्टिरक्षक) खेळाडू ३)अतुल सुर्वे ४) गणेश नवघणे ५) वृशांत गुंजाळ ६) अश्विन शिंदे ७) चैतन्य जाधव ८) निशांत जामसुतकर ९) सतीश राठोड १०) जितेश तामचीकर ११) स्वप्निल मुनगेल १२) ललित वाणी १३) योगेश पवार १४) अर्जुन दहिफळे १५) अनंता फटाले १६) साहील शेख असे असणार आहेत. तर या संघाचे व्यवस्थापक म्हणून शरद सावंत यांची तर प्रशिक्षक म्हणून राजू मुजावर यांची निवड झालेली आहे.

ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड, मुंबई,इंडीया यांच्या वतीने आणि दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या मार्फत आयोजित राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर निंबाळकर क्रिकेट अकॅडमी,शाहू कॉलेज,पुणे या ठिकाणी पार पडले.वेळी ३० पेक्षा जास्त खेळाडूंनी निवड चाचणीसाठी नाशिक, सातारा,सोलापूर, कोल्हापूर, पुणे,बीड, उस्मानाबाद अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

सदर निवड चाचणी शिबिर हे माजी रणजी खेळाडू मिलिंद गुंजाळ, श्रीकांत काटे व .इम्तियाज दाफेदार यांच्या त्रिस्तरीय निवड चाचणी समितीने घेतली.
यावेळी सौरभ रावळिया टुर्णामेंट कमिटी हेड,(ऑल इंडिया क्रिकेट असोशीएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड,मुंबई, इंडीया,) आणि .शरद सावंत, राजू मुजावर(माजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू) आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading