Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

अभिनेत्री हृता दुर्गुळे ठरली झी टॉकीज ची पॉप्युलर फेस ऑफ दि इअर

छोट्या पडद्यावरील समंजस जबाबदार नायिका म्हणून अभिनेत्री ऋता दुर्गुळेने ( Hrutha Durgule ) प्रेक्षकांचं मन जिंकलं होतच .  रंगभूमीवरही नटखट अंदाजातील पहिली भूमिका साकारत हृताने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आता हृताला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी पॉप्युलर फेस ऑफ दि इअर हा किताब दिला आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, रंगभूमी, सोशल मीडिया अशा प्रत्येक स्क्रिनवर हृताने सिक्सर मारला आहे. त्यात आता  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर  या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आणि तिच्या  आनंदालाही नवी पालवी फुटली .  झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा या पुरस्काराच्या रूपाने  प्रेक्षकांची पसंती कायम स्पेशल राहील असं म्हणत ऋताने हा आनंद साजरा केला .रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे
मराठी मनोरंजन विश्वात  मानाचा समजला जाणारा “महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? “हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली आहे. गेल्या वर्षभर प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधून विविध बारा विभागासाठी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ दि इअर, फेव्हरेट अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, सहाय्यक अभिनेता , सहाय्यक अभिनेत्री, फेव्हरेट सिनेमा, गायक, गायिका, गाणं, संगीतकार, दिग्दर्शक आणि स्टाईल आयकॉन अशा विभागांचा समावेश आहे. झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या कलाकारांमधून प्रेक्षकच त्यांच्या पसंतीची मोहर उमटवत असतात. त्यामुळे कलाकारांनाही हा सन्मान म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीच असते
रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . प्रेक्षकांच्या पसंतीतूनच महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? या पुरस्कारावर नाव कोरलेल्या कलाकारांना या सोहळ्यात गौरवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे . महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्यांना आवडणाऱ्या कलाकाराला मत दिल्यानंतर  या पुरस्कारावर नाव कोरले जाते.
छोट्या पडद्यावर मोठी प्रसिद्धी  मिळवणारी अभिनेत्री ऋता दुर्गळे सरत्या वर्षात मोठ्या पडद्यावरही झळकली. सोशल मीडियावर नेहमीच हिट असलेल्या ऋताची टीव्ही मालिकेतील प्रतिमा अतिशय सोज्वळ, समजूतदार नायिका अशी आहे. ऋताने टाइमपास ३ या पहिल्याच सिनेमात साकारलेल्या टपोरी गर्ल पालवीने अक्षरशा धमाल केली.  ती आली आणि तिने जिंकलं असच काहीस ऋता च्या बाबतीत झालं आहे. दुर्वा या मालिकेतून तिने अभिनयाला सुरूवात केली. फुलपाखरू . मन उडू उडू झालं या तिच्या मालिकाही गाजल्या. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातूनही ती प्रेक्षकांना आवडली. अनन्या आणि टाइमपास ३ या सिनेमाने ऋताला घराघरात पोहोचवलं. इन्स्टाग्रामवर ऋताचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर २५ लाख फॉलोअर्स असलेली ऋता ही एकमेव मराठी अभिनेत्री आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ऋता ची स्टाईल फॉलो केली जाते. ऋता सांगते ,” झी टॉकीज या वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्याचे हेच वैशिष्ट्य आहे की  हा पुरस्कार ज्या कलाकाराच्या हातात असतो त्या कलाकाराला प्रेक्षकांनी त्यांचं मत दिलेलं असतं . त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांकडून मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी नक्कीच खूप जवळचा ठरला आहे .
झी टॉकीज या वाहिनी तर्फे महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून प्रेक्षकांनी पसंती दिली हेच माझ्या अभिनयाचं सार आहे असं मला वाटतं . कलाकार म्हणून प्रत्येकालाच कोणतंही माध्यम हे खुणावत असतं . मी पण कधीच असं ठरवलं नव्हतं की मालिकांमध्ये काम करायचं की सिनेमात रमायचं की रंगभूमीवर स्वतःला सादर करायचं . पण जसजशी मला संधी मिळत गेली तसं मी त्या संधीचं सोनं करायचं इतकच ठरवलं होतं . मालिकांनी मला ओळख दिली . नाटकाने माझ्यातील रंगभूमीवरच्या अभिनयाला लागणारा आत्मवश्विास दिला. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील पहिली गोष्ट ही कायम खास असते आणि माझ्यासाठी झी टॉकीज वाहिनी तर्फे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून मिळलेली पुरस्काराची  भेट आयुष्यभर एक स्पेशल पुरस्कार बनवून राहील .”रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading