Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून गोपनीयतेचा भंग

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांकडून गोपनीयतेचा भंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदाना दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वत:चा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशिनचा फोटो काढला. इतकेच नव्हे तर त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मतदान हे गुपित असतं. मात्र, ठोंबरे पाटील यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये काँग्रेस उमेदवार धंगेकरांना मतदान केल्याचे दिसून येत आहे.

कसबा पेठमध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी आमने-सामने आहेत.
कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.

दरम्यान, दुसरीकडे रूपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मी अजून मतदानच केले नाही तर आचारसंहिता गोपनीयतेचा भंग कसा होईल? असा सवाल ठोंबरे यांनी केला आहे. तर रूपाली पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या धनंजय जाधव यांनी केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0HHLa4FNLarLxoAt2wrvQMUXLE51B5eQGMEB5v5mAkRf16fY7xtd8ggZyUvgg434hl&id=100044602476673&mibextid=Nif5oz

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading