धनुष्यबाण आणि शिवसेना नावासाठीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट पुन्हा म्हणाले ‘ठाकरे कल आना’
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून काल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली तेव्हा ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती त्यांनानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी घेण्यास नकार घेऊन सुनावणी बुधवारी घेण्यात येईल असे सांगितले.
मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे, लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही, असं कोर्टाने काल ठाकरे गटाला सुनावले होते. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता ठाकरे गट आपली याचिका दाखल केली. त्यावर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या ३.३० वाजता सुनावणी घेतली जाईल असे सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची याचिका उद्या दुपारी ३.३० वाजता ऐकणार असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. दरम्यानच्या काळात घटनापीठाचे कामकाज मात्र सुरू राहणार आहे. आयोगाविरोधात याचिका कोर्टाने ऐकू नये, त्यांना हायकोर्टानेही दोन वेळा नाकारले असा दावा शिंदे गटाने केला आहे उद्या स्थगिती मिळणार की नाही? यासंबधीची माहिती समोर येईल.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवरती सुप्रीम कोर्टात आजपासून सलग ३ दिवस सुनावणी पार पडणार आहे. हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचे की ५ न्यायाधीशांकडेच ठेवायचे याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. आता ३ दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
