Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

MPSC आंदोलन : मध्यरात्री शरद पवारांची आंदोलनस्थळी एन्ट्री आणि थेट मुख्यमंत्र्यांना फोन 

पुणे : राजयंसेवा परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यातील काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या भावना राज्यलोकसेवा आयोगाला कळवल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, लेखी आश्वासन नसल्याने विद्यार्थी ठाम होते. मात्र आज मध्यरात्री साडे आकाराच्या सुमारास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांनी थेट आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेतली. अन् तिथूनच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पवारांना दोन दिवसांत  बैठक घेण्याचा शब्द दिला. अन् विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.

याप्रसंगी कॉँग्रेसचे अतुल लोंढे उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून मी स्वत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक लावतो. तसेच एका कुलगुरूंनी 2023 पासून नवीन पॅटर्न लावणे अयोग्य असल्याचे पत्र दिले आहे असेही त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांशी बोलत असताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि त्यांच्याशी चर्चा केली, यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading